पोस्ट्स

2025 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...

इमेज
Updated -  १३ मे २०१३ साली "कमळ पाहिले मी राया" हा अभंग ऐकला. तेव्हा जे मनात उमटल ते पुढील लेखात आहे. आज तब्बल १२ वर्षांनी देखील हा अभंग आणि त्या अभंगावर मनात उमटलेले विचार तसेच आहेत. आज हा अभंग अधिक जवळचा वाटतो. जॉर्ज कार्व्हर अगदी यांची जीवनगाथा बाजूला ठेवून स्वतःच्या जीवनात जेव्हा हा अभंग पडताळून पाहते तेव्हा देखिल हाच विचार प्रवाहित होतो...की किरण असती बाहू माझे,  काहीही ना व्यर्थ जात.. Waste is only Tragedy आयुष्यातील काही मोलाची वर्षे फुकट गेली का? असा मनात प्रश्न उभा राहत असताना सदगुरुकडून उत्तर मिळते...खात्री मिळते...किरण असती बाहू माझे  काहीही ना व्यर्थ जात "जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यू लागो सार्थकी" ही प्रार्थना आद्यपिपादादांनी शिकविली. पण हा जन्म आणि हा मृत्यू केवळ एकाच वेळेचा आहे का?  माझा रोजचा होणारा जन्म आणि माझा रोजचा होणारा मृत्यू देखील सार्थकी लागला पाहीजे. माझ्या आयुष्यात येणारे विविध मृत्यू जसे किर्ती-अपकिर्तीचा मृत्यू, कर्तुत्वाचा मृत्यू, अपेक्षा-आशा-निराशा मृत्यू, अशा कोणत्याही प्रकारचे मृत्यू आणि त्या अनुषंगाने होणारे नविन जन्म हे देखिल सार्थ...

मृत्युच्या कविता -१ - मरण आलं होतं....

इमेज
कामासाठी वणवण फिरत होते हातात होते वजन पण पोटात नाही कण खिशात होता दाम पण संपत नव्हते काम कसबस काम संपवून अखेर जेवायला गेले भुकेचे वादळ केवळ वासानेच शमले पक्वान्नाने भरलेले समोर ताट शेवटी पिण्यासाठी थंडगार ताक घेणार पहिला घास तोच…… समोर रस्त्यावर लक्ष गेले कुणातरी कोवळया पोराला लोकांनी होते बेदम मारले हातातला घास तसाच राहिला होटल मालकाला जाब विचारला………  भुकेचे वादळ शमावयाला म्हणे, पोराने केली होती चोरी फुकट मार बसला अन् नाही मिळाली भाकरी चार दिवस अन्न न मिळालेला पोरगा स्व:तासाठी नाही तर  आईसाठी जगत होता चोरी करुनी का होइना पण आईसाठी सोसत होता……….  लागलीच ते पक्वान्न पॅक करुन त्याला दिले देव दिसला त्याला माझ्यात चटकन माझे पाय धरले ओशाळून मी जरा चार पावले मागे गेले जड़ झाले अंतकरण अन्, त्या दिवशी नाही जेवले……… काय माहित त्यादिवशी मोठं असं काय घडलं होतं ज्यामुळे न शमनाऱ्या माझ्या भुकेला मरण आलं होतं भुकेला मरण आलं होतं - रेश्मा नारखेडे 

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग 4- शेवटचा)

इमेज
थांब! अजून शेवटचा भाग संपला नाहीए. आत्मबलवर चार लेख लिहतेय. कारण एका भागात मला लिहणे आणि तुम्ही ते वाचण शक्य होणार नाही. इतका वेळ कुणाला आहे. पण रिल्स आणि शॉर्टसच्या जमान्यात वाचन हरवून बसलो आहोत. त्यामुळे आपले विचार प्रोसेस होत नाहीत. मला तरी असाच अनुभव आला त्यामुळे एका बाजूला लिखाण सुरु केले. असो, तर आता भरकटत जाण्यापेक्षा स्वतःलाच थांब! म्हणते. कारण आत्मबलमधील एक नाटक होत थांब!  विनोदाच्या अंगाने जाणारे हे नाटक हल्क फ़ुल्क असल तरिही समाजातील एका मोठ्या समस्येवर प्रकाश टाकणारे आहे. ती म्हणजे इजी मनी,  फास्ट मनीचा विळखा.  बापूंनी वारंवार सांगूनही ह्या विळख्यात बरेच जण अडकतात. तस होऊ नये म्हणून आईने हा मुद्दा इतका सुंदररित्या मांडला की तो या नाटकाच्या माध्यमाने पुरेपुर पोहोचला.  या नाटकातील जे मुख्य पात्र आहे. तिने फक्त संवाद आणि अभिनयातून विनोद नाही केला. तर तिचे संपूर्ण हावभाव, हातवारे अगदी सगळ्याचा उचित वापर करुन विनोद निर्माण होत होता. विनोदी शैलीतील नाटक करणे जास्त कठीण असते. कारण टायमिंगला पंच हवा तसा पडला नाही तर त्यात मजा येत नाही. पण फार उत्तम केले आहे. त्याल...

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग ३)

इमेज
काय योगायोग आहे बघा. उद्या शिवजयंती आणि आज मला आत्मबलमधील "हिरा" या इंग्रजी नाटकाबद्दल लिहण्यास मिळतय. अहाहा! नयनरम्य !! दुसरा शब्दच नाही माझ्याकडे.  इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है ! यावर नृत्य सुरू झाले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले. काय ते आगमन..!!! अंगावर काटाच आला. महाराजांचे आगमन झाले आणि आवाक होऊन आदराने प्रत्येक जण उभा राहीला. काय तो आब... काय तो रुबाब.. ज्या स्त्रीने ही महाराजांची भूमिका वठवली होती तिचे भूमिकेशी एकरूप होणे...समरस होणे इतक जबरदस्त होते की क्षणभर ही अस वाटले नाही, की ही भूमिका कुणी करीत आहे. हा धक्का इथवरच थांबत नाही.  पुढे अजून बरच काही आहे.  त्यातील प्रमुख बाब म्हणजे हे संपूर्ण नाटक इंग्रजीत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक नाटक, चित्रपट आली असावीत. पण इंग्रजीतून एखादे नाटक असणे त्यात इंग्रजीतून महाराज आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे विलक्षण आहे. इंग्रजीतून जरी हे नाटक असल तरी इतक सफाईदारपणे केले होते की त्यातील प्रत्येक भाव हा प्रत्येकाकडे पोहचत होता. It was purely love language. A mother's lo...

आमचा बापू लय भारी... आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी..(भाग २)

इमेज
एका पावरपॅक स्वागतगीतानंतर वेळ होती ती नाटकाची.   एक नाटक बसवायचे म्हणजे काय खायच काम आहे का? त्याची तयारी एका छोट्याश्या संकल्पनेपासून होते आणि ती संकल्पना विस्तारत जात जात तिच्यात अनेक गोष्टी ऍड होत होत एक नाटक तयार होते. पुढे त्यात कास्टींग आणि कलाकारांकडून त्यात जीव ओतला जातो आणि त्यात अखंड तालीमी करत करत पुढे प्रयोग होतो.  हे सार एखाद्या प्रोफेशनल नटासाठी देखील सोप्प ठरत नाही. त्याच्याही कलेचा कस लागतो. इथे तर साध्या गृहीणी, नोकरदार, कॉलेजला जाणार्‍या स्त्रिया व मुली आहेत. सर्वच्या सर्व मुली. त्यांच्यामधून एखाद कॅरेक्टर बाहेर काढायचे तेही अगदी एक दोन महिन्यात हे अशक्य आहे. कुणाला यावर विश्वास बसणार नाही. पण "तू आणि मी मिळुन शक्य नाही, अस या जगात काहीच नाही" हे बापूंचे ब्रीद वाक्य मनात उतरवून नंदाई या तिच्या बाळांकडून सराव करुन घेते. त्यासाठी तिची मेहनत, तासन तास उभ राहण. होणार्‍या चुका अचूक हेरण. अगदी लास्ट मोमेंटला देखील एखादा बदल करण... हे सारं सगळ अनुभवायला मिळत.   पण हे सारं कशासाठी? तर इम्पॅक्ट. जी गोष्ट सांगून कळत नाही किंवा अनेकदा डोळे उघडत नाही ती ...

आमचा बापू लय भारी... आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी..(भाग १)

इमेज
काहीही झाल तरी प्रोग्रॅम मिस करू नकोस. अश्या माझ्या काही फ्रेंड्स कडून एक आठवडा आधीपासून सूचना यायला लागल्या. तिकिटाची जबरदस्त मारामारी होती पण ती सोय आधीच झाल्याने टेन्शन नव्हत. माझी उत्सुकता आधीच ताणली गेली होती.. त्यात मी ठरवलच होत की कार्यक्रम पूर्णपणे एंजॉय करणारच. ज्याच आत्मबल झालाय ना आणि किंवा जो या कार्यक्रमासाठी सेवेला उपस्थित असतो ना त्यालाच ठाऊक आतमध्ये कार्यक्रमाची तयारी करताना काय काय होत असत. कशा घटना घडत जातात, कसे योगयोग जुळत जातात आणि सरते शेवटी या निर्णयाला येऊन पोहचतो की हे जे काय झाले ते आमचे नव्हेच. मोठी आई, बापू आणि नंदाई यांनी सर्व करवून घेतलेले असते. केवळ स्टेजवरील ऍक्टींग किंवा डान्स याचच कौतुक नाही तर यामागे सगळ्यांनाच कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडी आणि त्याग या सार्‍याचा परिपाक म्हणजे आत्मबलच स्नेहसंमेलन.  बाकी कुणाला यातून काय मिळत? अस वाटू शकत. पण यातून त्या आत्मबलच्या स्त्रीला जे मिळत ते केवळ तिलाच माहित. तो एक दिवस आणि त्यामागचे सहा महिने तिच्या आयुष्यात एखाद्या गोल्डन डेज सारखे कायमस्वरुपी राहतात.  बापू कृपे मला अश्या कार्यक्रमासाठी दोनदा संध...

तेव्हा स्वतःला बदल...

इमेज
                                                                      AI generated Image  तेव्हा स्वतःला बदल... कथामंजिरी ४ च्या पाचव्या भागात "सखाराम" गोजीबाईला म्हणतो तेव्हा काही वाक्य खुप महत्त्वाची वाटली. कारण मूळ कारण गरिबीत आहे आणि तुमच्या असहाय्य स्थितीत आहे व त्या गोष्टी एका क्षणात थोड्याच बदलणार आहेत? तेव्हा स्वतःला बदल. इथे बापूंनी "तेव्हा स्वतःला बदल" ह्या शब्दांना अंडरलाईन केली आहे आणि मला वाटत या कथामंजिरी सिरिजमधील गोजीबाईच्या लाईफमधील टर्निंग पॉइंट आहे. कारण यानंतर गोजीबाईने ज्या प्रकारे स्वतःला कॅरी केले आहे. ते वाचण्यासारखे आहे.  इथे मला आठवले ते श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज "सत्यप्रवेश"मधील चरण क्रमांक २. "प्रत्येकजण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि परिस्थितीला सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. परंतु मला माझी परिस्थिती बदलायची असेल तर आधी मला स्वत:ला बदलायला पाहिजे हे तो लक्षात घेत नाही. माझ्य...

आधी ते सावधपण - मला समजलेली गोजीबाई भाग २

इमेज
  खर तर गोजिबाईवर लिहू तितके कमी आहे. कथामंजीरी १-६ मध्ये काशिनाथ म्हणतात,  "माझी गोजी माणसांना नीट ओळखणारी आहे."   अग्रलेखांमध्ये हे वाक्य चटकन येऊन जात. पण तीची ही क्वालिटी अतीशय सुपर आहे. आजच्या कलियुगात ही कला म्हणजेच माणस ओळखण्याची कला नीट अवगत असणे अत्यंत आवश्यक आहे. गोजीकडे असलेले हे नैपुण्य तीला त्या वस्तीबद्दल खरी माहिती करुन देत.   नेहमी आपण ऐकतो समोरुन गोड बोलणारी माणस कधी पाठीत सुरा खुपसतील याचा काही नेम नाही. नेहमी वडीलधारी माणस सल्ला देतात की माणस ओळखायला शिका आणि ९९ टक्के आपण इथेच फसतो.   अभिनय कौशल्य सिद्ध होण्यासाठी प्रत्येक माणसाने स्टेजवरच काम केले पाहिजे अस काही नाही. खर्‍या आयुष्यात ही अगदी प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिका वठवत असतो, विविध रुपे घेत असतो. स्वतःच्या स्वार्थ सिद्धिसाठी नाना बनाव रचित असतो. या अश्या सगळ्या माणसांना आपल्याला ओळखता आले पाहिजे. तसेच चांगल्या, शुद्ध मनाच्या माणसांना ओळखता येणे देखिल फार गरजेचे आहे. एकंदरीतच संपुर्ण कथामंजिरीमध्ये गोजीबाईची ही क्षमता आपल्याला वेळोवेळी पाहण्य़ास मिळते.  सुरुवातीला...

द सिक्रेट ऑफ शिलेदार - पाहण्यासारखी वेबसिरीज

इमेज
     तुम्हाला जर रहस्यपट पाहण्यास आवडत असतील आणि तुम्ही इंडियाना जोन्स सारखे चित्रपटांचे फैन असाल तर शिवकालीन इतिहासावर बेतलेला "द सिक्रेट ऑफ शिलेदार" ही वेबसिरीज पाहण्यास तुम्हाला मजा येईल.           कोणाचीही तुलना न करता ही वेबसिरीज पाहिली तर सर्वच पैलूनी ही उजवी ठरते. तसेच    छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शिलेदार यांच्या रहस्य रंजक कथेवर आधारित ही वेबसिरीज असल्याने एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळून जाते.     द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ ही वेब सिरीज ३१ जानेवारी २०२५ रोजी डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. ही सिरीज डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या ‘प्रतिपश्चंद्र’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी इतिहास, साहस आणि कल्पनारम्यतेचा मिलाफ करून एक मनोरंजक कथा साकारली आहे. कथेचा केंद्रबिंदू आहे डॉ. रवी (राजीव खंडेलवाल), जो इतिहासाचा उत्साही विद्यार्थी आहे. त्याला एका न्यायाधीशाकडून आपल्या पालकांच्या मृत्यूचे रहस्य आणि ‘शिलेदार’ या गुप्त समाजाबद्दल माहिती मिळते.     शिलेदार हे छत्रपती शिवाजी महाराज...

मला समजलेली ’गोजीबाई’ - कथामंजीरी ४ मधील मुख्य पात्र

इमेज
(Generated By Using Meta AI Not A Real Image.) कथामंजिरी ४ मधील गोजीबाई हे कॅरेक्टर माझ्या मनात घर करुन गेले.  या गोजीबाईबद्दल काही मुद्दे    ही गोजिरी, गोजीरवाणि सुंदर आहे. जिच बालपण सातार्‍यात गेले आहे. सख्खी ८ भावंडे आहेत. ७ वी पर्यंत शिकलेली आहे. इंग्रजीची आवड असणारी आहे. अभ्यासाची आवड असणारी आहे. जीचे वडील वारकरी आहेत. तीला भजनाची सवय आहे. हार्मोनियम वाजविता येतो. अभंग १००च्यावर पाठ आहेत. काशीनाथ पाटलाबरोबर विवाह झालेला आहे आणि तिला दोन मुली व एक मुलगा आहे.    जिची हरिहरावर नितांत श्रद्धा आहे. जिचे आजूबाजूचे निरिक्षण करण्य़ाची क्षमता उत्तम आहे. जी सावध आहे. जिच्या निती अनितीच्या संकल्पना, पातिव्रत्याच्या संकल्पना स्पष्ट आहेत. ती अत्यंत प्रॅगमॅटीक आहे. तिच्यात एका पुरुषाला समर्थपणे दोन लगावून देण्याची शारिरीक आणि बौद्धीक क्षमता आहे. तसेच ती एक उत्तम अभिनय करु शकते. एखादी कला, गोष्ट आत्मसात करण्य़ाची तीची क्षमता अफाट आहे आणि आत्तापर्यंतच्या कोणत्याही भागात ती स्वतः न्यूनगंडात असल्याचे जाणवले नाही.    हा भगवान त्रिविक्रम माझ्याकडून सर्व काही करुन घेईल....

तशी उलघडली मला आज आई - गद्य कविता. Marathi Poem - ThinkBigReshma

इमेज
सुगंध पसरवित जशी उमलली जाई  अशी उलघडली मला आज आई 'आ' म्हणुनी आत्मा जागविला  'ई' म्हणुनी ईश्वर भेटविला  आत्मा जागवणारि ईश्वरी दाती ती होई  अशी उलघडली मला आज आई सहन करी ती भार कुकर्माचा  अत्याचार सोसे पोटच्या बालकांचा  तरी न कोपे ती वसुंधरा माई  अशी उलघडली मला आज आई असंख्य पापांनी माखलेले आयुष्य आमचे  पावन करुनी ती, अविरत धुवत असे  स्वतः मलिन होउनी, पुण्यदाती गंगा ती होई  अशी उलघडली मला आज आई कोटी देव सामावुनी पोटी सात्विकतेचे दान घालिते ती ओटी  झरा वात्सल्याचा सदा पाझरता ठेवती ह्या गाई  अशी उलघडली मला आज आई यवन अत्याचाराचा झाला कहर लोपले निति-धर्म-सत्व, अंधाराचा प्रहर घडवुनी शिवराय, जिजाऊ तप्त तेजसूर्य देई  अशी उलघडली मला आज आई अवघड जी वाट रांगड्या मर्दांना  सहज उतरुनी ती जाई, कापुनी कड्यांना ममतेचा पराक्रम हिरकणी गाजवुनी राही  अशी उलघडली मला आज आई पारतंत्र्याच्या बेडीत स्वतः अडकुनी  जागविला पुरुषार्थ लेकरांच्या मनी  आज ती स्वतंत्रदेवता, पण सहन केले किती आम्हा पाई  अशी उलघडली मला आज आई आ...