आमचा बापू लय भारी... आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी..(भाग २)
एका पावरपॅक स्वागतगीतानंतर वेळ होती ती नाटकाची.
एक नाटक बसवायचे म्हणजे काय खायच काम आहे का? त्याची तयारी एका छोट्याश्या संकल्पनेपासून होते आणि ती संकल्पना विस्तारत जात जात तिच्यात अनेक गोष्टी ऍड होत होत एक नाटक तयार होते. पुढे त्यात कास्टींग आणि कलाकारांकडून त्यात जीव ओतला जातो आणि त्यात अखंड तालीमी करत करत पुढे प्रयोग होतो. हे सार एखाद्या प्रोफेशनल नटासाठी देखील सोप्प ठरत नाही. त्याच्याही कलेचा कस लागतो. इथे तर साध्या गृहीणी, नोकरदार, कॉलेजला जाणार्या स्त्रिया व मुली आहेत. सर्वच्या सर्व मुली. त्यांच्यामधून एखाद कॅरेक्टर बाहेर काढायचे तेही अगदी एक दोन महिन्यात हे अशक्य आहे. कुणाला यावर विश्वास बसणार नाही.
पण "तू आणि मी मिळुन शक्य नाही, अस या जगात काहीच नाही" हे बापूंचे ब्रीद वाक्य मनात उतरवून नंदाई या तिच्या बाळांकडून सराव करुन घेते. त्यासाठी तिची मेहनत, तासन तास उभ राहण. होणार्या चुका अचूक हेरण. अगदी लास्ट मोमेंटला देखील एखादा बदल करण... हे सारं सगळ अनुभवायला मिळत.
पण हे सारं कशासाठी? तर इम्पॅक्ट. जी गोष्ट सांगून कळत नाही किंवा अनेकदा डोळे उघडत नाही ती दृकश्राव्य माध्यमातून सहजसोपी होते. कधी कधी कानपिचक्या ह्या द्याव्याच लागतात. डोळे उघडावे लागतात. समाजातील स्थितिची जाणिव व्हावी लागते. त्यासाठी अनेक माध्यमे आहेत आणि नाटक हे त्यातीलच एक प्रभावी माध्यम आहे.
बापू त्यांच्या प्रवचनातून, कथामंजिरीतून हे काम अविरत करत आहेत. तसच नंदाई तिच्या आत्मबलच्या प्लॅटफॉर्ममधून आणि सुचितदादा त्यांच्या क्लिनिकमधून बापूंची शिकवण आपल्यामध्ये रुजविण्याचे कार्य करित आहे अस मला वाटते. एकच उद्देश श्रद्धावानांनी जरा शहाणे बनावे. त्यांचे जीवन सुखी व्हावे. समाजात उभ्या ठाकणार्या परिस्थींती जाणिव त्यांना व्हावी.
अशाच एका विषयावर बेतलेले नाटक होते. "डाव". नाटकाची सुरुवात कशी गुडी गुडी नात्यांनी होते आणि मग नंतर एकेकाचे रंग उघडे पडू लागतात. यामध्ये नवरा गमाविलेल्या एका एकट्या श्रद्धावान स्त्रीने कशाप्रकारे बापूंच्या मदतीने खंबीरपणे आपले जीवन जगायला सुरुवात केलेली आहे याची गोष्ट दिसून येते. पण तिचा फायदा उचलू पाहणार्या नातेवाईकांचा खरा चेहरा तिला माहित नसतो. पण बापू कृपेने ते कस समजत याबद्द्ल ही कथा आहे.
यामध्ये या एक खुप महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने शिकण्यास मिळाली आणि ती म्हणजे "नाही" म्हणायला शिकणे. बापूंनी पण सांगितले आहे की आपल्याला ठामपणे नाही म्हणता आले पाहीजे. एक चांगला माणूस कायम इथेच फसतो कारण त्याला "नाही" म्हणता येत नाही. कारण त्यांना समोरच्यांना दुखवायचे नसते. पण तस नाही. आपल्या खांद्यावर आपलेच डोके कसे असले पाहीजे हे या नाटकातून कळत. जे भाऊमामाचे आहे. त्यामुळे त्याला सर्व गोष्टी स्पष्टपणे दिसू लागतात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट कळते म्हणजे "आपण एकटे असू पण एकाकी कधीच नसतो." कारण बापू, आई आणि दादा आपल्या सोबत कायम आहेत. त्यामुळे आपला फायदा कोणीच कधी उचलू शकत नाही. आपल्या विरोधात कितीही कट कारस्थाने रचली, किती डाव मांडले तरी ते उलटायचे कसे हे बापूंना बरोबर ठाऊक आहे. त्यामुळे बापूंच्या श्रद्धावानांविरोधात कुणीही कितीही कट कारस्थाने रचत असेल तर ते कधीच तडीस जात नाही. हे जे नाटकातून दाखविले आहे असेच कित्येक जणांचे अनुभव देखील आहेत. त्यामुळे ही आत्मबलची नाटक फार रिलेट होतात.
आता या नाटकातील जे कलाकार आहेत त्यांनी जबरदस्त काम केले आहे. त्यातील आज्जी आणि भाऊमामा विशेष लक्षात राहतात. त्यातील ज्या वयस्कर स्त्रीची भुमिका केलेली जी स्त्री आहे ती खरच त्या वयाची आहे की तीने तस बेरींग धरलय हे काय मला समजल नाही. पण या दोन्ही केसमध्ये त्यांच काम उत्तम झाले आहे.
सगळ्यात मज्जा आली ती एकता कपूर स्टाईलमध्ये कॉस्मेटीक सर्जरी करुन मुख्य पात्र बदलण्याची ट्रीक. अफलातून कल्पना. नाटकात बहुतेक पहिल्यांदाच कुणी तरी वापरली आहे. पण खरच सांगू ती या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे शेवट पर्यंत जाणवतच नाही. मला तर हे फार आवडल. दोन शिट्ट्यापण मारल्या मी. फक्त त्याचा आवाज नाही आला.
त्या आज्जींच्या ७५ वाढदिवसाच्या दिवशी सुंदरकाण्ड पठणाचा कार्यक्रम ठेवण्याची संकल्पना किति सुरेख आहे. काय काय दिले आहे ना बापूंनी आपल्याला याची जाणीव होते. श्रद्धावान परिवार असाच एकमेकांना जेव्हा धरुन राहिल तेव्हा कुटील डाव रचणारे श्रद्धाहीन पूर्णपणे निष्क्रिय होऊन जातील हा सायलेंट मेसेज कुणाच्या लक्षात आला आहे की नाही कुणास ठाऊक?
त्यानंतरच असलेले नाटक "प्रमोशन" तर आजकालच्या मुलींसाठी डोळ्यात अंजन आहे. हे नाटक तर मला फार रिलेट झाले. आईचे आईपण सुद्धा एक खुप मोठ करियर आहे. नाही का? मॉंसाहेब जिजाऊ यांचे सर्वात मोठे उदाहरण आपण घेऊ शकतो. त्यामुळे मॉंसाहेब हे त्यांचे पद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारख्या पुत्राला तयार करायचे असेल तर जिजाऊंसारखीच आई हवी. बाळांसाठी आपल्या ब्राईट करियरवर पाणी सोडणार्या कित्येक स्त्रीया मी पाहील्या आहेत. ज्यांचा मला खुप रिस्पेक्ट आहे. बापू कृपे ही वेळ माझ्यावर कधी नाही आली. पण ही वेळ आणि असा ब्रेकींग पॉईंट येतोच. यावेळी बापू आई सावरुन घेतात. त्यांचा सपोर्ट मिळतोच मिळतो. हा माझा अनुभव आहे.
या नाटकामुळे "प्रमोशन" आणि करियर या दोन्हींच्या व्याख्या रिडिफाईन करण्यास आत्ताच्या पिढीला खुप मदत होईल. आणि त्यांनी त्या केल्याच पाहिजे. नाहीतर डिंक क्लचर म्हणजेच ड्बल इनकम नो किडच्या आहारी समाज जाऊ लागेल. याबद्दल बापूंनी एका अधिवेशनात देखिल माहिती दिल्याचे मला आठवते.
यातील कलाकारांनी खुप सुंदर काम केले आहे. आईच्या पोटातील बाळाचे मनोगत ज्या सुरेख पद्धतीने मांडले आहे त्यास तोड नाही. त्यामागे एलईडीवर झळकलेले फोटो खुप प्रभाव टाकणारे होते.
आता तुम्ही म्हणाल, सगळीकडे अशी आयडीयल परिस्थीती असू शकत नाही.
बरोबर आहे तुमच.
पण येस यावर एक आयडीयल सोल्युशन नक्कीच आहे.
अनिरुद्धभक्ती.
आणि आईने हे अगदी छातीठोकपणे दोन्ही नाटकांतून दाखवून दिले आहे.
अस मला वाटते.
@thinkbigreshma |Reshma Narkhede
टिप्पण्या
.नंदाईला अगदी हेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं. नाटकाचा गाभा त्याचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा म्हणून आईने अतोनात कष्ट घेतलेत. या स्त्रिया कधीही स्टेजवर चढलेल्या नाहीत. यातील एकही स्त्री professional actor नाहीये. फक्त एक ते दीड महिन्याच्या प्रॅक्टिस मध्ये या स्त्रियांचा अभिनय एका professional actor पेक्षाही उत्तम होता. ही सगळी नंदाईची किमया.