युद्ध... आणि सजग नागरिकत्वाची खरी परीक्षा
१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्ध घडून गेलं. त्याआधीही मॉक ड्रिल्स घेण्यात आल्या होत्या. आज पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्र समोर उभं राहत आहे. ७ मे 2025 रोजी युद्धसदृश्य परिस्थितीचा सराव—मॉक ड्रिल—होणार आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देश तयारीच्या स्थितीत आहेत. आपणही सतत “भारत पाकिस्तानला नेस्तनाबूत करो!” असा जयघोष करत असतो. हे साहजिक आहे—राष्ट्रभक्ती आपल्या रक्तात भिनलेली आहे. पण… खरंच युद्ध सुरू झालं, तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार आहोत का? युद्ध हे केवळ सीमारेषेवर लढवलं जात नाही, ते देशाच्या अंतःकरणात लढवलं जातं. सैनिक रणांगणात असतो, पण सामान्य नागरिकही त्याच्या मागे अडचणींशी लढत असतो—पाण्याची टंचाई, अन्नधान्याचा तुटवडा, औषधांचा अभाव, विजेचा अपुरा पुरवठा… आणि मनावरचा अज्ञात भीतीचा ताण! युद्ध आणि मनोभूमी आपण सामान्य माणसं—घरं सांभाळणारी, ऑफिसमध्ये काम करणारी, मुलांना शाळेत घालणारी—युद्धाच्या पडसादांबद्दल अनभिज्ञ असतो. पण आम्ही बापूभक्त मात्र सुदैवी आहोत. “तिसरे महायुद्ध” हे श्रीअनिरुद्धांनी लिहिलेलं पुस्तक आणि "अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट...