आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग ३)
काय योगायोग आहे बघा. उद्या शिवजयंती आणि आज मला आत्मबलमधील "हिरा" या इंग्रजी नाटकाबद्दल लिहण्यास मिळतय.
अहाहा! नयनरम्य !! दुसरा शब्दच नाही माझ्याकडे.
इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है ! यावर नृत्य सुरू झाले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले. काय ते आगमन..!!! अंगावर काटाच आला. महाराजांचे आगमन झाले आणि आवाक होऊन आदराने प्रत्येक जण उभा राहीला. काय तो आब... काय तो रुबाब..
ज्या स्त्रीने ही महाराजांची भूमिका वठवली होती तिचे भूमिकेशी एकरूप होणे...समरस होणे इतक जबरदस्त होते की क्षणभर ही अस वाटले नाही, की ही भूमिका कुणी करीत आहे. हा धक्का इथवरच थांबत नाही.
पुढे अजून बरच काही आहे.
त्यातील प्रमुख बाब म्हणजे हे संपूर्ण नाटक इंग्रजीत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक नाटक, चित्रपट आली असावीत. पण इंग्रजीतून एखादे नाटक असणे त्यात इंग्रजीतून महाराज आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे विलक्षण आहे. इंग्रजीतून जरी हे नाटक असल तरी इतक सफाईदारपणे केले होते की त्यातील प्रत्येक भाव हा प्रत्येकाकडे पोहचत होता. It was purely love language. A mother's love.
खरी कथा होती त्या हिरकणीची आणि ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय पूर्ण होणे शक्य नव्हते.
त्यानंतरचा पुढील धक्का म्हणजे किल्ला रायगड. स्वराज्याचा मानबिंदू. रायगडाचा जबरदस्त फिल निर्माण केला आहे. यासाठी प्रॉपर्टी टीम आणि एल इ डी टीम चे विशेष कौतुक. अगदी दर्जा काम केले आहे.
हिरकणीची जिने भूमिका केली आहे ती अगदी अप्रतिम आहे. बाळासाठीची तिची आतुरता अगदी पोहचते. ती जेव्हा बुरुज उतरून खाली येते तो सिन येवढा जबरदस्त केलाय की माझ्याकडे शब्द नाहीत. ती जेव्हा बुरुजावरून खाली उतरते तेव्हा तिचा शैडो मागे एल इ डीवरील बुरुजाच्या चित्रणाशी परफेक्ट मैच होत होता.. त्यामुळे ही मागची स्क्रीन केवळ जागा भरायला नाही तर तिचे मोठे योगदान नाटकात आहे..
आणि ज्यांनी बुरुजाची भूमिका केली...हो!हो! यंदा ह्युमन प्रॉपर्टी वापरण्यात आली होती. काही स्त्रिया या बुरुज बनल्या होत्या. त्यांचं पुतळा होणं खूप कौतुकास्पद आहे. आणि शेवटी आईने BTS देखील दाखविले की हा बुरुज कसा तयार केला. खरच हॅट्स ऑफ..
यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांच्या कीर्तीचा पोवाडा तोही इंग्रजीमध्ये...हे म्हणजे कळसच होत..
हे नाटक म्हणजे उत्तम अभिनय, नेपथ्य आणि संगीत नाटकाचा फिल देणारी उत्तम कलाकृती होती.
या नाटकाला शिवगर्जनेत पूर्ण श्री हरिगुरुग्राम दुमदुमले होते. असा अद्भुत अनुभव मिळाला.
"हिरा" हि जशी एक वीरा आहे आणि बापूंच्या लेकींनी ही अस वीरा असाव हे आईने दाखवून दिले. श्रद्धावान स्त्रीने मनात आणल तर कोणताही कठीणातील कठीण बुरुज ती पार करू शकते. कोणतेही शिखर सर करू शकते. कोणताही पराक्रम गाजवू शकते. कारण हीच खरी भारतीय स्त्रीची ओळख आहे. ह्या एका नाटकातून आईने हे दाखवून दिले.
आजची स्त्री देखील आपल्या बाळांना सोडून नोकरीसाठी पळते. तिला हव्या हव्या असणाऱ्या कित्येक गोष्टींचा त्याग करते. तेव्हा ती एक वीरांगनाच असते हे सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे.
मातृत्व मिळते तेच मुळात त्याग केल्याने. "त्यें त्यक्तेन भुंजिथा" याचे क्लासिकल उदाहरण म्हणजे एक आई. आणि आईच्या मातृत्वाच्या पराक्रमाची आठवण करुन देणारे हे नाटक.
@thinkbigreshma | Reshma Narkhede
टिप्पण्या