पोस्ट्स

ARTICLES लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग ३)

इमेज
काय योगायोग आहे बघा. उद्या शिवजयंती आणि आज मला आत्मबलमधील "हिरा" या इंग्रजी नाटकाबद्दल लिहण्यास मिळतय. अहाहा! नयनरम्य !! दुसरा शब्दच नाही माझ्याकडे.  इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है ! यावर नृत्य सुरू झाले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले. काय ते आगमन..!!! अंगावर काटाच आला. महाराजांचे आगमन झाले आणि आवाक होऊन आदराने प्रत्येक जण उभा राहीला. काय तो आब... काय तो रुबाब.. ज्या स्त्रीने ही महाराजांची भूमिका वठवली होती तिचे भूमिकेशी एकरूप होणे...समरस होणे इतक जबरदस्त होते की क्षणभर ही अस वाटले नाही, की ही भूमिका कुणी करीत आहे. हा धक्का इथवरच थांबत नाही.  पुढे अजून बरच काही आहे.  त्यातील प्रमुख बाब म्हणजे हे संपूर्ण नाटक इंग्रजीत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक नाटक, चित्रपट आली असावीत. पण इंग्रजीतून एखादे नाटक असणे त्यात इंग्रजीतून महाराज आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे विलक्षण आहे. इंग्रजीतून जरी हे नाटक असल तरी इतक सफाईदारपणे केले होते की त्यातील प्रत्येक भाव हा प्रत्येकाकडे पोहचत होता. It was purely love language. A mother's lo...

आमचा बापू लय भारी... आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी..(भाग १)

इमेज
काहीही झाल तरी प्रोग्रॅम मिस करू नकोस. अश्या माझ्या काही फ्रेंड्स कडून एक आठवडा आधीपासून सूचना यायला लागल्या. तिकिटाची जबरदस्त मारामारी होती पण ती सोय आधीच झाल्याने टेन्शन नव्हत. माझी उत्सुकता आधीच ताणली गेली होती.. त्यात मी ठरवलच होत की कार्यक्रम पूर्णपणे एंजॉय करणारच. ज्याच आत्मबल झालाय ना आणि किंवा जो या कार्यक्रमासाठी सेवेला उपस्थित असतो ना त्यालाच ठाऊक आतमध्ये कार्यक्रमाची तयारी करताना काय काय होत असत. कशा घटना घडत जातात, कसे योगयोग जुळत जातात आणि सरते शेवटी या निर्णयाला येऊन पोहचतो की हे जे काय झाले ते आमचे नव्हेच. मोठी आई, बापू आणि नंदाई यांनी सर्व करवून घेतलेले असते. केवळ स्टेजवरील ऍक्टींग किंवा डान्स याचच कौतुक नाही तर यामागे सगळ्यांनाच कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडी आणि त्याग या सार्‍याचा परिपाक म्हणजे आत्मबलच स्नेहसंमेलन.  बाकी कुणाला यातून काय मिळत? अस वाटू शकत. पण यातून त्या आत्मबलच्या स्त्रीला जे मिळत ते केवळ तिलाच माहित. तो एक दिवस आणि त्यामागचे सहा महिने तिच्या आयुष्यात एखाद्या गोल्डन डेज सारखे कायमस्वरुपी राहतात.  बापू कृपे मला अश्या कार्यक्रमासाठी दोनदा संध...

एक एक पाकळी प्रेमाची

इमेज
वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी. यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे. हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते.  आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प...