पोस्ट्स

जानेवारी २४, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मला समजलेली ’गोजीबाई’ - कथामंजीरी ४ मधील मुख्य पात्र

इमेज
(Generated By Using Meta AI Not A Real Image.) कथामंजिरी ४ मधील गोजीबाई हे कॅरेक्टर माझ्या मनात घर करुन गेले.  या गोजीबाईबद्दल काही मुद्दे    ही गोजिरी, गोजीरवाणि सुंदर आहे. जिच बालपण सातार्‍यात गेले आहे. सख्खी ८ भावंडे आहेत. ७ वी पर्यंत शिकलेली आहे. इंग्रजीची आवड असणारी आहे. अभ्यासाची आवड असणारी आहे. जीचे वडील वारकरी आहेत. तीला भजनाची सवय आहे. हार्मोनियम वाजविता येतो. अभंग १००च्यावर पाठ आहेत. काशीनाथ पाटलाबरोबर विवाह झालेला आहे आणि तिला दोन मुली व एक मुलगा आहे.    जिची हरिहरावर नितांत श्रद्धा आहे. जिचे आजूबाजूचे निरिक्षण करण्य़ाची क्षमता उत्तम आहे. जी सावध आहे. जिच्या निती अनितीच्या संकल्पना, पातिव्रत्याच्या संकल्पना स्पष्ट आहेत. ती अत्यंत प्रॅगमॅटीक आहे. तिच्यात एका पुरुषाला समर्थपणे दोन लगावून देण्याची शारिरीक आणि बौद्धीक क्षमता आहे. तसेच ती एक उत्तम अभिनय करु शकते. एखादी कला, गोष्ट आत्मसात करण्य़ाची तीची क्षमता अफाट आहे आणि आत्तापर्यंतच्या कोणत्याही भागात ती स्वतः न्यूनगंडात असल्याचे जाणवले नाही.    हा भगवान त्रिविक्रम माझ्याकडून सर्व काही करुन घेईल....