एक एक पाकळी प्रेमाची

वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी. यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे. हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते. आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प...