आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग 4- शेवटचा)
थांब! अजून शेवटचा भाग संपला नाहीए. आत्मबलवर चार लेख लिहतेय. कारण एका भागात मला लिहणे आणि तुम्ही ते वाचण शक्य होणार नाही. इतका वेळ कुणाला आहे. पण रिल्स आणि शॉर्टसच्या जमान्यात वाचन हरवून बसलो आहोत. त्यामुळे आपले विचार प्रोसेस होत नाहीत. मला तरी असाच अनुभव आला त्यामुळे एका बाजूला लिखाण सुरु केले. असो, तर आता भरकटत जाण्यापेक्षा स्वतःलाच थांब! म्हणते. कारण आत्मबलमधील एक नाटक होत थांब!
विनोदाच्या अंगाने जाणारे हे नाटक हल्क फ़ुल्क असल तरिही समाजातील एका मोठ्या समस्येवर प्रकाश टाकणारे आहे. ती म्हणजे इजी मनी, फास्ट मनीचा विळखा.
बापूंनी वारंवार सांगूनही ह्या विळख्यात बरेच जण अडकतात. तस होऊ नये म्हणून आईने हा मुद्दा इतका सुंदररित्या मांडला की तो या नाटकाच्या माध्यमाने पुरेपुर पोहोचला.
या नाटकातील जे मुख्य पात्र आहे. तिने फक्त संवाद आणि अभिनयातून विनोद नाही केला. तर तिचे संपूर्ण हावभाव, हातवारे अगदी सगळ्याचा उचित वापर करुन विनोद निर्माण होत होता. विनोदी शैलीतील नाटक करणे जास्त कठीण असते. कारण टायमिंगला पंच हवा तसा पडला नाही तर त्यात मजा येत नाही. पण फार उत्तम केले आहे. त्याला BGM ची उत्तम जोड आणखीन रंगत आणते. यासाठी म्युझिक टीमचे खुपच कौतुक.
नेमके त्याच आठवड्याच्या गुरुवारी इजीमनी वर एक अनुभव दाखवला गेला. त्यामुळे हे नाटक अगदी जवळच वाटल. त्यानंतर या डीजीटल युगात आपण कशी काळजी घ्यावी याचे जे मुद्दे मांडले गेले त्याची फारच गरज होती. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर ही गोष्ट बोलणे आवश्यक होते. घात करणारे नेहमी जवळचेच असतात. हे या नाटकाने परत अधोरेखीत झाले. म्हणून कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाण्याआधी अथवा कश्यावरही पटकन विश्वास ठेवण्याआधी बुद्धीने मनाला सांगितले पाहिजे थांब!! आणि ते मनाने ऐकले पाहिजे.
या आधी एक डान्स होता. तेलंगणामधील बथुकम्मा-बोनालू उत्सव दर्शवणारा. तेथील नऊ दिवसांच्या ह्या उत्सवाची माहीती घेताना अस आढळल की तेलगुमध्ये Bathukamma बथुकम्माचा अर्थ आहे "Mother Goddess Come Alive" आणि नंदाईने या डान्समध्ये खरच देवी उभी केली होती. जी सर्व गावकर्यांमध्ये फिरत होती. हे दृष्य इतक नयनरम्य होते की विचारु नका. इतका बारीक विचार केला गेला याचे मला फारच अप्रुप वाटले.
यानंतर, शेवटचा फिनालेची तर मी अपेक्षाच केली नव्हती. आईने चक्क एक रॅपसॉंग तेही बापूंवर घेतले होते. आजच्या जमान्याला शोभेल अस, आजच्या पिढीला आवडेल असच. एक नंबर भारी अस होते. त्यासोबत मागच्या बाजूला LED वर प्ले करण्यात आलेला व्हीडीओ म्हणजे कमाल. कमाल. कमाल...नियोन थिम वापरुन बापू नाम तयार करणे, अस बरच काही यात होत. हे रॅप सॉंग रिलिज कराव अस वाटत मला.
आमचा बापू लय भारी... ही रॅप सॉंगची थीम होती.
तूच त्रिपुरारी , तूच त्रिविक्रमा
भक्तांचा तू कैवारी
येवो संकट किती तरी नाही भीती
आमचा बापू लय भारी
रॅप -
बापू अनिरुद्ध माझ्या पंढरीच्या राया
सावळा रे रंग तुझा मोहक तुझी काया
सुरुवातीचे येवढेच लिरिक्स आठवत आहेत मला. पण जे काय आहे पूर्ण ते एकदम भारी आहे. माझी खुप इच्छा होती की बापूंवर एक रॅप सॉंग यावे. ती इच्छा आईने पूरी केली. कारण रॅप हा प्रकार माझा आवडता प्रकार आहे. लिरिक्स आणि व्होकल्सवर याचा पूर्ण भर असतो आणि एका विशिष्ट पद्धतीने त्याची डिलिव्हरी असते. तरुणांमध्ये तुफान प्रिय आणि नेमका इफेक्ट पाडणारे असते. तर आत्मबल टीमचे खुप अभिनंदन की त्यांनी ही गोष्ट अचिव्ह केली.
दिल खुश हो गया....
सो नॉऊ ऍट द एण्ड...आत्मबल कार्यक्रम आपल्यासमोर मांडताना आईने अफाट मेहनत घेतली आहे आणि ती आज एका वर्षी घेतली अस नाही. जेव्हा पासून आत्मबल सुरु झाल तेव्हा पासून ती मेहनत करतेय आणि आम्हा सर्वांकडून करुन घेते. तर मग आत्मबलची स्टुडंट म्हणून इतना लिखना तो बनता है ना?
आई जे समोर मांडते ते पुर्णपणे ग्रहण करण येवढ तरी आपल्याला नक्कीच जमू शकत. आणि तेच ग्रहण केलेले या ब्लॉगच्या निमित्ताने तुमच्यापुढे मांडल कारण बापूंनीच सांगितले आहे.
GRAB EVERY HAPPINESS
Hope तुम्ही देखील तेच केले असेल.
@thinkbigreshma | Reshma Narkhede
टिप्पण्या