आधी ते सावधपण - मला समजलेली गोजीबाई भाग २
खर तर गोजिबाईवर लिहू तितके कमी आहे.
कथामंजीरी १-६ मध्ये काशिनाथ म्हणतात,
"माझी गोजी माणसांना नीट ओळखणारी आहे."
अग्रलेखांमध्ये हे वाक्य चटकन येऊन जात. पण तीची ही क्वालिटी अतीशय सुपर आहे. आजच्या कलियुगात ही कला म्हणजेच माणस ओळखण्याची कला नीट अवगत असणे अत्यंत आवश्यक आहे. गोजीकडे असलेले हे नैपुण्य तीला त्या वस्तीबद्दल खरी माहिती करुन देत.
नेहमी आपण ऐकतो समोरुन गोड बोलणारी माणस कधी पाठीत सुरा खुपसतील याचा काही नेम नाही. नेहमी वडीलधारी माणस सल्ला देतात की माणस ओळखायला शिका आणि ९९ टक्के आपण इथेच फसतो.
अभिनय कौशल्य सिद्ध होण्यासाठी प्रत्येक माणसाने स्टेजवरच काम केले पाहिजे अस काही नाही. खर्या आयुष्यात ही अगदी प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिका वठवत असतो, विविध रुपे घेत असतो. स्वतःच्या स्वार्थ सिद्धिसाठी नाना बनाव रचित असतो. या अश्या सगळ्या माणसांना आपल्याला ओळखता आले पाहिजे. तसेच चांगल्या, शुद्ध मनाच्या माणसांना ओळखता येणे देखिल फार गरजेचे आहे. एकंदरीतच संपुर्ण कथामंजिरीमध्ये गोजीबाईची ही क्षमता आपल्याला वेळोवेळी पाहण्य़ास मिळते.
सुरुवातीला ती सखारामवरही पूर्ण विश्वास ठेवत नाही. इथे विश्वास कुणावर ठेवायचा हा मोठा प्रश्न असतो. त्यात ह्या गोजीबाईला माणस कशी काय बरे ओळखता येत असावीत? हा मला प्रश्न पडला. तेव्हा जाणवले की
गोजीचा स्वयंभगवान त्रिविक्रमावरचा असलेला अगाध विश्वास हेच यामागचे दिसून आले. कारण हा त्रिविक्रम आपल्याला आपल्या आयुष्यातील माणसांचे खरे चेहरे समोर आणायला मदत करित असतो. किंबहुना तोच हे करु शकतो.
मागच्या गुरुवारी श्री हरिगुरुग्रामला एक अनुभव ऐकला उरणच्या मुनिश म्हात्रे ह्यांचा. फास्टमनीच्या नादात मित्राच्या नादाला लागून फार मोठी गुंतवणूक करायला निघाले होते. मित्राच्या गोड गोड बोलण्यावर आणि दबावाला बळी पडून गुंतवणूक करणार होते. पण बापूंनी अशा पद्धतीने सुत्र हलवली की त्यांनी अश्या स्किममध्ये गुंतवणूक करण्याचा विचारच सोडून दिला. मला हा अनुभव इथे कनेक्ट करावासा वाटतो कारण या भक्ताचा अनिरुद्ध बापूंवर विश्वास आहे म्हणून त्यांना उचित मार्ग दाखविला जातो. माणसाचे खरे चेहरे देखील हा त्रिविक्रम आपल्यासमोर उघड करत असतो. त्यामुळे हे स्किल आत्मसात करण्यासाठी त्रिविक्रमावर अगाध विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
इथे अजून एक गोष्ट सांगाविशी वाटते ती म्हणजे सीता अपहरणाची. रावण जसा वेश पालटून, साधू बनून, भिक्षेचा आव आणित, धर्म अधर्मच्या हवा तश्या व्याख्या बनवित सीतेच्या सदसदविवेकबुद्धीवर पडदा पाडतो आणि तिला प्रज्ञापराध करण्यास भाग पाडतो. असेच कलियुगात माणसे स्वतःच्या स्वार्थासाठी मुखवटे लावून वागत असतात. त्यामुळे कुणाच्या गप्पांमध्ये किति अडकावे, कुणावर किती विश्वास ठेवावा याचे धडे लहानपणापासूनच मुलांना द्यायला हवे. आणि आपणही "आधी ते सावधपण" याप्रमाणे कायम सावध रहावे. अर्थात ही सीता अपहरणाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी फार मॊठी मार्गदर्शक आहे. बापूंनी लिहलेल्या रामरसायनमध्ये ज्याप्रमाणे हा प्रसंग मांडला आहे त्यातून बरेच शिकण्यासारखे आहे.
गोजीबाईचा अध्यात्माचा बेस पक्का असल्याने तीला असे सावधपण बाळगणे सहज शक्य झाले. श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज प्रथम खंड "सत्यप्रवेश’ यामधील चरण ४१ मध्ये बापूंनी सावधपणा अचुकपणे मांडला आहे.
प्रपंच असो की वैराग्य, भक्त असो की अभक्त, ह्या मानवी जीवनात दर क्षणाला सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे ‘सावधपणा’.
मी सावध असेन तरच मी घडणाऱ्या घटनांचा अर्थ नीट समजून घेऊ शकतो, व माझ्याशी संबंधित गोष्टींचा नीट अर्थ कळला तरच मी सावधपणे पुढील हालचाल करू शकतो. नाहीतर संकटे बारा वाटा येतच राहतात म्हणून मला आताच सावध व्हायला हवे.
हे सांगताना पुढे ते सावधपणा व संशयीवृत्ती यातील फरक देखील स्पष्ट करतात.
घोड्यावर बसताना घोडा कसा आहे, खोगीर ठीक आहे की नाही, हे नीट बघणे म्हणजे सावधपणा तर, बाप रे ! घोड्याचा काय नेम? आता शांत असेल, नंतर खवळला तर? खोगीर मधेच तुटले तर? असे विचार करणे म्हणजे संशयीपणा.
या एका उदाहरणामध्ये फरक स्पष्ट होतो.
जेव्हा गोजीबाई त्या वस्तीत जाते. तीच्याकडे पर्याय ही नसतो. खरी वस्ती रात्रीच कळते आणि रात्रीच्या कुशीत तीला संपूर्ण वस्ती समजते. हे तिला ठाउक आहे. हेच ते तिचे सावधपण. माणस ओळखताना सुद्धा असे सावधपण बाळगणे गरजेचे आहे. हे ज्याला जमल ना तो त्याच्या जीवनाचा खरा खुरा मास्टर होईल...अगदी गोजीसारखा.
आजच्या सोशल मिडीया आणि ए आय च्या जगात हे तर आणखीन चॅलेंजिंग आहे. फेक गोष्टींनी आजूबाजूचे जग विस्फारत चालले आहे. अशावेळी खर सोनं म्हणजेच सोन्यासारखी माणसे ओळखायची असल्यास त्रिविक्रमाच्याभक्ती शिवाय पर्याय नाही. हेच मला उमगले.
- Reshma Narkhede | @thinkbigreshma
टिप्पण्या