युद्ध... आणि सजग नागरिकत्वाची खरी परीक्षा


१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्ध घडून गेलं. त्याआधीही मॉक ड्रिल्स घेण्यात आल्या होत्या. आज पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्र समोर उभं राहत आहे. ७ मे 2025 रोजी युद्धसदृश्य परिस्थितीचा सराव—मॉक ड्रिल—होणार आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देश तयारीच्या स्थितीत आहेत. आपणही सतत “भारत पाकिस्तानला नेस्तनाबूत करो!” असा जयघोष करत असतो. हे साहजिक आहे—राष्ट्रभक्ती आपल्या रक्तात भिनलेली आहे.

पण…
खरंच युद्ध सुरू झालं, तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार आहोत का?

युद्ध हे केवळ सीमारेषेवर लढवलं जात नाही, ते देशाच्या अंतःकरणात लढवलं जातं. सैनिक रणांगणात असतो, पण सामान्य नागरिकही त्याच्या मागे अडचणींशी लढत असतो—पाण्याची टंचाई, अन्नधान्याचा तुटवडा, औषधांचा अभाव, विजेचा अपुरा पुरवठा… आणि मनावरचा अज्ञात भीतीचा ताण!

युद्ध आणि मनोभूमी
आपण सामान्य माणसं—घरं सांभाळणारी, ऑफिसमध्ये काम करणारी, मुलांना शाळेत घालणारी—युद्धाच्या पडसादांबद्दल अनभिज्ञ असतो. 

पण आम्ही बापूभक्त मात्र सुदैवी आहोत.
“तिसरे महायुद्ध” हे श्रीअनिरुद्धांनी लिहिलेलं पुस्तक आणि "अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट" या संस्थेमुळे मनोभूमी तयार झाली आहे.
युद्ध काही चकाकणाऱ्या बंदुकांचा खेळ नसतो. ते जीवघेणं वास्तव असतं.
त्यामुळे नागरिक म्हणून आपली तयारी युद्धकाळात सर्वात आवश्यक ठरते ती मनःस्थिती आणि सजगता.

युद्धामध्ये जिंकणं, हरणं हे निर्णय सरकारी पातळीवर घेतले जातात, पण त्या निर्णयांचा भार सामान्य जनतेच्या खांद्यावर येतो.

म्हणून "युद्ध नको" हा पर्याय कधी कधी नसतो—पण त्यासाठी पूर्णपणे तयार असणं हा एकमेव उपाय असतो.

सजग नागरिक म्हणून आपली तयारी काय?
आज सर्वात मोठी गरज आहे ती – स्वतःला सज्ज ठेवण्याची. युद्धासारख्या स्थितीला सामोरे जाताना नागरिकांनी कोणती भूमिका घ्यावी, याचा विचार झाला पाहिजे.

✅ Disaster Management कोर्सेस केवळ औपचारिकता न राहता, जीवनरक्षक ठरतात.
✅ प्रथमोपचाराचे ज्ञान, मानसिक स्थैर्य, आणि स्वयंशिस्त ही युद्धकाळातील खरी साधनं आहेत.
✅ अफवांपासून, सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या बनावट AI कंटेंटपासून दूर राहणं अत्यावश्यक आहे.

युद्ध सुरू झालं तर आपण काय करणार? भीतीने घाबरणार? की इतरांना साहाय्य करणारा एक सजग आणि समर्थ नागरिक बनणार?

श्रीरामाचा रणमंत्र – मनशक्तीची कवच
युद्धाची भीती मनात उभी राहणं साहजिक आहे. पण बापूंनी आपल्याला दिलेला मंत्र आहे:

“श्रीराम राम रणकर्कश राम राम”


हा मंत्र मनाला बळ देतो, स्थैर्य देतो. शरीर टिकवण्यासाठी मनाचे संरक्षण आवश्यक असते, आणि हाच मंत्र मनाचं कवच बनतो.


"Survival of the Fittest – Not the Best"
युद्धकाळात कोण जिंकतो हे फक्त ताकदीवर नाही ठरत—तर तयारीवर आणि शिस्तीवर ठरतं.
"सर्वोत्कृष्ट" असणं पुरेसं नाही. जो सजग, शिस्तबद्ध आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहे, तोच टिकतो.

आजच्या घडीला देश आपल्याकडून फक्त जयघोष अपेक्षित ठेवत नाही, तर जबाबदारीची जाणीव आणि सज्जता देखील अपेक्षित ठेवतो.
सरकार आपल्या सुरक्षेसाठी पूर्णपणे सज्ज आहे, आपणसुद्धा त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे.

युद्धकाळात मॉक ड्रिल्स होतील, सूचना मिळतील – पण त्या वेळची खरी परीक्षा ही आपल्या सजग आणि उत्तरदायी नागरिकत्वाचीच असेल.

म्हणूनच –
सजग राहा. सक्षम बना. श्रीरामाच्या मंत्राच्या छायेत आत्मविश्वासाने उभे रहा.
कारण आपण केवळ प्रेक्षक नाही – आपण भारतमातेचे सच्चे सैनिक आहोत!

- ThinkbigReshma  Reshma Narkhede

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मला समजलेली ’गोजीबाई’ - कथामंजीरी ४ मधील मुख्य पात्र

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग ३)