तशी उलघडली मला आज आई - गद्य कविता. Marathi Poem - ThinkBigReshma

सुगंध पसरवित जशी उमलली जाई अशी उलघडली मला आज आई 'आ' म्हणुनी आत्मा जागविला 'ई' म्हणुनी ईश्वर भेटविला आत्मा जागवणारि ईश्वरी दाती ती होई अशी उलघडली मला आज आई सहन करी ती भार कुकर्माचा अत्याचार सोसे पोटच्या बालकांचा तरी न कोपे ती वसुंधरा माई अशी उलघडली मला आज आई असंख्य पापांनी माखलेले आयुष्य आमचे पावन करुनी ती, अविरत धुवत असे स्वतः मलिन होउनी, पुण्यदाती गंगा ती होई अशी उलघडली मला आज आई कोटी देव सामावुनी पोटी सात्विकतेचे दान घालिते ती ओटी झरा वात्सल्याचा सदा पाझरता ठेवती ह्या गाई अशी उलघडली मला आज आई यवन अत्याचाराचा झाला कहर लोपले निति-धर्म-सत्व, अंधाराचा प्रहर घडवुनी शिवराय, जिजाऊ तप्त तेजसूर्य देई अशी उलघडली मला आज आई अवघड जी वाट रांगड्या मर्दांना सहज उतरुनी ती जाई, कापुनी कड्यांना ममतेचा पराक्रम हिरकणी गाजवुनी राही अशी उलघडली मला आज आई पारतंत्र्याच्या बेडीत स्वतः अडकुनी जागविला पुरुषार्थ लेकरांच्या मनी आज ती स्वतंत्रदेवता, पण सहन केले किती आम्हा पाई अशी उलघडली मला आज आई आ...