आमचा बापू लय भारी... आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी..(भाग १)



काहीही झाल तरी प्रोग्रॅम मिस करू नकोस. अश्या माझ्या काही फ्रेंड्स कडून एक आठवडा आधीपासून सूचना यायला लागल्या. तिकिटाची जबरदस्त मारामारी होती पण ती सोय आधीच झाल्याने टेन्शन नव्हत. माझी उत्सुकता आधीच ताणली गेली होती.. त्यात मी ठरवलच होत की कार्यक्रम पूर्णपणे एंजॉय करणारच.

ज्याच आत्मबल झालाय ना आणि किंवा जो या कार्यक्रमासाठी सेवेला उपस्थित असतो ना त्यालाच ठाऊक आतमध्ये कार्यक्रमाची तयारी करताना काय काय होत असत. कशा घटना घडत जातात, कसे योगयोग जुळत जातात आणि सरते शेवटी या निर्णयाला येऊन पोहचतो की हे जे काय झाले ते आमचे नव्हेच. मोठी आई, बापू आणि नंदाई यांनी सर्व करवून घेतलेले असते. केवळ स्टेजवरील ऍक्टींग किंवा डान्स याचच कौतुक नाही तर यामागे सगळ्यांनाच कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडी आणि त्याग या सार्‍याचा परिपाक म्हणजे आत्मबलच स्नेहसंमेलन. 

बाकी कुणाला यातून काय मिळत? अस वाटू शकत. पण यातून त्या आत्मबलच्या स्त्रीला जे मिळत ते केवळ तिलाच माहित. तो एक दिवस आणि त्यामागचे सहा महिने तिच्या आयुष्यात एखाद्या गोल्डन डेज सारखे कायमस्वरुपी राहतात. 

बापू कृपे मला अश्या कार्यक्रमासाठी दोनदा संधी मिळाली पण तरीही २०२५ चा कार्यक्रम पाहिल्यावर मी आईला बोलले मला या बैच मध्ये घ्यायचा होता ना!! (गेली तेरा वर्ष मी प्रत्येक कार्यक्रम नंतर हेच बोलते) 

पण तीच कास्टिंग खूप परफेक्ट असत...कुणाची निवड कुठे करायची हे बरोबर माहीत असत. एका भौतिक पातळीवर देखील आणि त्या त्या स्त्रीच्या जीवनाशी देखील फार निगडीत असत. 

२०२५ चा  कार्यक्रम टेक्निकली तर मागाच्यावेळेपेक्षा एक स्टेप पुढेच होता पण काही विशेष गोष्टी ज्यावर बारीक काम केले गेले ते वाखाण्याजोगे आहे.

ओपनिंग सॉंग शिवशंकराचे ❤️ हेच पहिले डोळ्याचे पारणे फेडणारे होते. यासाठी जिची शंकर म्हणून निवड केली होती ती किती परफेक्ट हे मला वेगळे सांगायला नको. तीची नृत्यकला..कुरळे केस..उंच बांधा हे सारच कस आईने हेरल याच मला फार कौतुक वाटलं. डमरुचा ताल धरून नृत्याविष्कार करणारा नटराज किती सुंदर प्रेझेंट करण्यात आला. यास साजेसा कैलास पर्वत स्टेजवर आणि एलइडीवर देखील सुंदर साधर्म्य साधण्यात आले. याच गाण्यात पुढे आलेले राधाकृष्ण, श्रीराम, लक्ष्मण जानकी व नंतर आलेलेल बापू..ही जी काय मांदियाळी समोर दिसत होती ती भव्य दिव्य वाटत होत.

जस सर्व देवतांना आवाहन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो तस नमनच हे मला वाटले. शंकर पार्वती यांची जी ग्रेस जपली आहे त्याला तोड नाही. पुढे  आजूबाजूला नाचणाऱ्या सर्व मुलींच्या कॉस्च्युमची रंगसंगती देखील एकदम सयुक्तिक होती. Visual Treat जे काय असत ना ते जाणवले. यामध्ये गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांच्या देवतांचे जेव्हा आगमन झाले तो तर एकदम Wow मोंमेंट होता. सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे या नद्यांच्या देवतांची वेषभूषा. यांच्या ड्रेसेसचे रंग गंगा यमुनेचे जसे आहेत तसेच घेतले होते. ही गोष्ट दाखवून देते की यावर किती बारीक दृष्टीने विचार केला गेला आहे. 

बापू आई दादा शंकराच्या पिंडीवर मागे स्क्रीन वर बेल अर्पण करतात त्याची पोझीशन ऍक्च्युअल स्टेजवर ठेवलेल्या शिवलिंगाशी इतकी जुळवली आहे की साक्षात बापू ही स्टेजवर आल्याचे जाणवते. हा जो एलईडी आणि स्टेजवरील प्रोप्रटीमधील साधलेला मेळ यावर्षी खुप अचूक दिसून आला. 

जर मला पाहताना इतक्या गोष्टी लक्षात आल्या तर ज्यांनी या सगळ्याची तयारी केली त्यांनी किती किती बारीक गोष्टींचा विचार केला असेल. त्यामुळे ह्या आत्मबलच्या कार्यक्रमाचा रिव्हू मी एका भागात लिहूच शकत नाही. कारण माझ्यासाठी प्रेक्षक म्हणून केवळ कार्यक्रम पाहण नव्हत तर खर खुप काही शिकण्यासारखे होते.  

तर भेटु पुढच्या भागात. 

@thinkbigreshma |Reshma Narkhede

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
लई भारी होता सोहळा.
अनामित म्हणाले…
Really khupach bhari hot ...aaichi aafat mehanat त्याचबरोबर सगळी टीचर ते आणि सगळे participate... Sagale musician aani sagali technical team ..ambadnya ..khup afalatun program
अनामित म्हणाले…
Lay bhari pan me miss kele
अनामित म्हणाले…
Ambadnya
अनामित म्हणाले…
सोहळा खूपच छान होता पण तुम्ही केलेलं वर्णन वाचण्यात आणखीनच मज्जा आहे, तिथे राहून सोहळा अनुभवणे आणि नंतर तुम्ही केलेल वर्णन वाचणं म्हणजे दुग्ध शर्करा योग!!! पुढच्या भागाची वाट बघतोय..
अनामित म्हणाले…
खूप सुंदर लिहिले आहेस.
अनामित म्हणाले…
आत्मबलचा कार्यक्रम म्हणजे कायमच गोल्डन ट्रीट असते.
आणि ह्या तुमच्या लेखातून ती ट्रीट आम्ही पुन्हा अनुभवत आहोत त्या बद्दल मनापासून अंबज्ञ... 🤩🙏💯🎉 😍

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मृत्युच्या कविता -१ - मरण आलं होतं....

किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...