आमचा बापू लय भारी... आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी..(भाग २)

एका पावरपॅक स्वागतगीतानंतर वेळ होती ती नाटकाची. एक नाटक बसवायचे म्हणजे काय खायच काम आहे का? त्याची तयारी एका छोट्याश्या संकल्पनेपासून होते आणि ती संकल्पना विस्तारत जात जात तिच्यात अनेक गोष्टी ऍड होत होत एक नाटक तयार होते. पुढे त्यात कास्टींग आणि कलाकारांकडून त्यात जीव ओतला जातो आणि त्यात अखंड तालीमी करत करत पुढे प्रयोग होतो. हे सार एखाद्या प्रोफेशनल नटासाठी देखील सोप्प ठरत नाही. त्याच्याही कलेचा कस लागतो. इथे तर साध्या गृहीणी, नोकरदार, कॉलेजला जाणार्या स्त्रिया व मुली आहेत. सर्वच्या सर्व मुली. त्यांच्यामधून एखाद कॅरेक्टर बाहेर काढायचे तेही अगदी एक दोन महिन्यात हे अशक्य आहे. कुणाला यावर विश्वास बसणार नाही. पण "तू आणि मी मिळुन शक्य नाही, अस या जगात काहीच नाही" हे बापूंचे ब्रीद वाक्य मनात उतरवून नंदाई या तिच्या बाळांकडून सराव करुन घेते. त्यासाठी तिची मेहनत, तासन तास उभ राहण. होणार्या चुका अचूक हेरण. अगदी लास्ट मोमेंटला देखील एखादा बदल करण... हे सारं सगळ अनुभवायला मिळत. पण हे सारं कशासाठी? तर इम्पॅक्ट. जी गोष्ट सांगून कळत नाही किंवा अनेकदा डोळे उघडत नाही ती ...