द सिक्रेट ऑफ शिलेदार - पाहण्यासारखी वेबसिरीज

तुम्हाला जर रहस्यपट पाहण्यास आवडत असतील आणि तुम्ही इंडियाना जोन्स सारखे चित्रपटांचे फैन असाल तर शिवकालीन इतिहासावर बेतलेला "द सिक्रेट ऑफ शिलेदार" ही वेबसिरीज पाहण्यास तुम्हाला मजा येईल. कोणाचीही तुलना न करता ही वेबसिरीज पाहिली तर सर्वच पैलूनी ही उजवी ठरते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शिलेदार यांच्या रहस्य रंजक कथेवर आधारित ही वेबसिरीज असल्याने एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळून जाते. द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ ही वेब सिरीज ३१ जानेवारी २०२५ रोजी डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. ही सिरीज डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या ‘प्रतिपश्चंद्र’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी इतिहास, साहस आणि कल्पनारम्यतेचा मिलाफ करून एक मनोरंजक कथा साकारली आहे. कथेचा केंद्रबिंदू आहे डॉ. रवी (राजीव खंडेलवाल), जो इतिहासाचा उत्साही विद्यार्थी आहे. त्याला एका न्यायाधीशाकडून आपल्या पालकांच्या मृत्यूचे रहस्य आणि ‘शिलेदार’ या गुप्त समाजाबद्दल माहिती मिळते. शिलेदार हे छत्रपती शिवाजी महाराज...