पोस्ट्स

फेब्रुवारी २१, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग 4- शेवटचा)

इमेज
थांब! अजून शेवटचा भाग संपला नाहीए. आत्मबलवर चार लेख लिहतेय. कारण एका भागात मला लिहणे आणि तुम्ही ते वाचण शक्य होणार नाही. इतका वेळ कुणाला आहे. पण रिल्स आणि शॉर्टसच्या जमान्यात वाचन हरवून बसलो आहोत. त्यामुळे आपले विचार प्रोसेस होत नाहीत. मला तरी असाच अनुभव आला त्यामुळे एका बाजूला लिखाण सुरु केले. असो, तर आता भरकटत जाण्यापेक्षा स्वतःलाच थांब! म्हणते. कारण आत्मबलमधील एक नाटक होत थांब!  विनोदाच्या अंगाने जाणारे हे नाटक हल्क फ़ुल्क असल तरिही समाजातील एका मोठ्या समस्येवर प्रकाश टाकणारे आहे. ती म्हणजे इजी मनी,  फास्ट मनीचा विळखा.  बापूंनी वारंवार सांगूनही ह्या विळख्यात बरेच जण अडकतात. तस होऊ नये म्हणून आईने हा मुद्दा इतका सुंदररित्या मांडला की तो या नाटकाच्या माध्यमाने पुरेपुर पोहोचला.  या नाटकातील जे मुख्य पात्र आहे. तिने फक्त संवाद आणि अभिनयातून विनोद नाही केला. तर तिचे संपूर्ण हावभाव, हातवारे अगदी सगळ्याचा उचित वापर करुन विनोद निर्माण होत होता. विनोदी शैलीतील नाटक करणे जास्त कठीण असते. कारण टायमिंगला पंच हवा तसा पडला नाही तर त्यात मजा येत नाही. पण फार उत्तम केले आहे. त्याल...