तेव्हा स्वतःला बदल...
AI generated Image
तेव्हा स्वतःला बदल...कथामंजिरी ४ च्या पाचव्या भागात "सखाराम" गोजीबाईला म्हणतो तेव्हा काही वाक्य खुप महत्त्वाची वाटली.
कारण मूळ कारण गरिबीत आहे आणि तुमच्या असहाय्य स्थितीत आहे व त्या गोष्टी एका क्षणात थोड्याच बदलणार आहेत?
तेव्हा स्वतःला बदल.
इथे बापूंनी "तेव्हा स्वतःला बदल" ह्या शब्दांना अंडरलाईन केली आहे आणि मला वाटत या कथामंजिरी सिरिजमधील गोजीबाईच्या लाईफमधील टर्निंग पॉइंट आहे. कारण यानंतर गोजीबाईने ज्या प्रकारे स्वतःला कॅरी केले आहे. ते वाचण्यासारखे आहे.
इथे मला आठवले ते श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज "सत्यप्रवेश"मधील चरण क्रमांक २.
"प्रत्येकजण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आणि परिस्थितीला सुधारण्यासाठी सर्व प्रयत्न करतो. परंतु मला माझी परिस्थिती बदलायची असेल तर आधी मला स्वत:ला बदलायला पाहिजे हे तो लक्षात घेत नाही. माझ्यात चांगले काय आहे व वाईट काय आहे ह्या दोन्ही गोष्टी नीट जाणून घेऊन त्यानुसार अभ्यासपूर्वक स्वत:ला बदलणे अत्यंत आवश्यक असते. परिस्थिती बदलली, अगदी सर्व जग बदलले परंतु मी बदललो नाही तर त्याचा काय उपयोग?"
अग्रलेखातील तेव्हा स्वतःला बदल हे वाक्य या चरणाकडेच निर्देश करत. अस मला वाटत. त्यामूळे ते वाक्य जितक गोजीबाईसाठी महत्त्वाचे आहे, तितक ते माझ्यासाठी आहे आणि अगदी प्रत्येकासाठी आहे.
आपल्यातील प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या असहाय्य स्थितीत अडकलो असणारच. कुठे ती स्थिती भौतिक असेल कुठे ती स्थिती मानसिक असेल कुठे ती स्थिती सामाजिक असेल. स्थिती परिस्थीती कोणतेही असो प्रत्येकासाठी हेच चरण ऍपलिकेबल आहे. अस मला वाटते. मी स्वतः बदललो की माझ्या आजुबाजूची परिस्थिती आपोआप बदलते. पण स्वतःला बदलणे कसे हवे तर अभ्यासपूर्वक. माझ्यात चांगले काय? वाईट काय? याचा ऍनालिसीस करुन स्वतःला बदलणे. हे वैयक्तिक झाल.
पण गोजीबाईसारखी परिस्थीती ओढावली तर तात्पुरते देखील बदल स्वीकारणे किती आवश्यक आहे सखारामाच्या बोलण्यावरुन कळत. यालाच Survival of the fittest अस म्हणतात.
इथे "फिटनेस" म्हणजे फक्त शारीरिक ताकद नाही, तर त्या व्यक्तीची किंवा प्रजातीची पर्यावरणाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या क्षमतेला दर्शवते. उदाहरणार्थ, एखादी प्राणी त्याच्या अन्न मिळवण्याची क्षमता, शत्रूंपासून वाचण्याची क्षमता, किंवा कठोर हवामानाला तोंड देण्याची क्षमता, हे सर्व त्याच्या "फिटनेस"चे भाग असू शकतात. ही संकल्पना फक्त नैसर्गिक जगातच नाही, तर आर्थिक किंवा सामाजिक क्षेत्रातही वापरली जाते. ज्यांना बदलत्या परिस्थितींशी तडजोड करता येते, तेच यशस्वी होतात, आणि इतर मागे पडतात. आणि या कलियुगात "Survival of the fittest, not the best" हेच तत्त्व काम करत. याबाबत बापू अनेकदा त्यांच्या प्रवचनातून बोलले आहे. गोजीबाई आणि काशीनाथ या तत्त्वावर चालताना अग्रलेखांतून दिसतात.
पण wait..wait..
हे सारं व्ह्यायच कस? मला स्वतःमध्ये कायमचा किंवा तात्पुरता बदल करण्याची ताकद मिळणार कशी? तर ह्याच उत्तर लगेचच श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज "सत्यप्रवेश"मधील चरण क्रमांक ३ मध्ये बापूंनी दिलेले आहे.
स्वत: बदलण्याची शक्ती मला प्राप्त होते, ती परमेश्वराच्या स्मरणातून. मग ते रूपस्मरण असेल, गुणस्मरण असेल, नामसंकीर्तन असेल किंवा नामस्मरण.
येस!!
जय जय हरिहरा भगवंता । जय जय हरिहरा त्रिविक्रमा॥
हा गजरच, हे नामस्मरणच सर्व ताकद गोजीबाईंना पुरवीत असल्याचे आपण पाहतो. तसेच हाच गजर तिला मार्गदर्शन करत असल्याचे आपण पाहतो. तिलाच काय तर काशीनाथरावांना सुद्धा.
मला अस जाणवल की, या अग्रलेखांच्या माध्यमातून जे कॅरेक्टर्स बापू उभे करीत आहेत त्यांचा बेस पूर्णपणे श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराजमध्ये आहे. त्यांच वागण, बोलण, एका पुरुषार्थी श्रद्धावानांसारख आहे. जेणे करुन आपण ही त्यांच सहज करुन अनुकरण जीवनात पुरुषार्थ करु शकतो. बापूंची शिकवण आयुष्यात उतरवू शकतो. ते आपले मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर वावरत आहेत.
Change Is The Only Constant तेव्हा तू स्वतःला बदल ही त्या सखा असणार्या रामाची प्रत्यक्ष आज्ञाच मला वाटली. सगळ्यांसाठीच.
- @thinkbigreshma | रेश्मा नारखेडे
टिप्पण्या