मृत्युच्या कविता -१ - मरण आलं होतं....

कामासाठी वणवण फिरत होते हातात होते वजन पण पोटात नाही कण खिशात होता दाम पण संपत नव्हते काम कसबस काम संपवून अखेर जेवायला गेले भुकेचे वादळ केवळ वासानेच शमले पक्वान्नाने भरलेले समोर ताट शेवटी पिण्यासाठी थंडगार ताक घेणार पहिला घास तोच…… समोर रस्त्यावर लक्ष गेले कुणातरी कोवळया पोराला लोकांनी होते बेदम मारले हातातला घास तसाच राहिला होटल मालकाला जाब विचारला……… भुकेचे वादळ शमावयाला म्हणे, पोराने केली होती चोरी फुकट मार बसला अन् नाही मिळाली भाकरी चार दिवस अन्न न मिळालेला पोरगा स्व:तासाठी नाही तर आईसाठी जगत होता चोरी करुनी का होइना पण आईसाठी सोसत होता………. लागलीच ते पक्वान्न पॅक करुन त्याला दिले देव दिसला त्याला माझ्यात चटकन माझे पाय धरले ओशाळून मी जरा चार पावले मागे गेले जड़ झाले अंतकरण अन्, त्या दिवशी नाही जेवले……… काय माहित त्यादिवशी मोठं असं काय घडलं होतं ज्यामुळे न शमनाऱ्या माझ्या भुकेला मरण आलं होतं भुकेला मरण आलं होतं - रेश्मा नारखेडे