पोस्ट्स

I am not totally useless… at least

इमेज
“I am not totally useless… at least ______.” Complete this line honestly, and you might change the way you see yourself. We are often too harsh on ourselves. We focus on what’s missing, what’s not working, what we haven’t achieved yet. But pause for a moment. Even on your lowest days, you are still something. Still capable. Still meaningful. Still present. For me, this line became: “I am not totally useless… at least I can pray.” And that changed everything. Because prayer means hope. It means connection. It means I still have faith, still have strength, still have something pure to offer — even when everything else feels uncertain. Maybe for you it is: …at least I can try again. …at least I can learn. …at least I can help someone. …at least I can stand back up. That “at least” is not small. It is the beginning of rebuilding yourself. So don’t underestimate it. Complete your line. Hold onto it. Grow from it. #Perspective #SelfWorth #InnerStrength #Mindset #Growth #Aniru...

युद्ध... आणि सजग नागरिकत्वाची खरी परीक्षा

इमेज
१९७१ साली भारत-पाकिस्तान युद्ध घडून गेलं. त्याआधीही मॉक ड्रिल्स घेण्यात आल्या होत्या. आज पुन्हा एकदा तसंच काहीसं चित्र समोर उभं राहत आहे. ७ मे 2025 रोजी युद्धसदृश्य परिस्थितीचा सराव—मॉक ड्रिल—होणार आहे. भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाचं वातावरण आहे. दोन्ही देश तयारीच्या स्थितीत आहेत. आपणही सतत “भारत पाकिस्तानला नेस्तनाबूत करो!” असा जयघोष करत असतो. हे साहजिक आहे—राष्ट्रभक्ती आपल्या रक्तात भिनलेली आहे. पण… खरंच युद्ध सुरू झालं, तर एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तयार आहोत का? युद्ध हे केवळ सीमारेषेवर लढवलं जात नाही, ते देशाच्या अंतःकरणात लढवलं जातं. सैनिक रणांगणात असतो, पण सामान्य नागरिकही त्याच्या मागे अडचणींशी लढत असतो—पाण्याची टंचाई, अन्नधान्याचा तुटवडा, औषधांचा अभाव, विजेचा अपुरा पुरवठा… आणि मनावरचा अज्ञात भीतीचा ताण! युद्ध आणि मनोभूमी आपण सामान्य माणसं—घरं सांभाळणारी, ऑफिसमध्ये काम करणारी, मुलांना शाळेत घालणारी—युद्धाच्या पडसादांबद्दल अनभिज्ञ असतो.  पण आम्ही बापूभक्त मात्र सुदैवी आहोत. “तिसरे महायुद्ध” हे श्रीअनिरुद्धांनी लिहिलेलं पुस्तक आणि "अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट...

किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...

इमेज
Updated -  १३ मे २०१३ साली "कमळ पाहिले मी राया" हा अभंग ऐकला. तेव्हा जे मनात उमटल ते पुढील लेखात आहे. आज तब्बल १२ वर्षांनी देखील हा अभंग आणि त्या अभंगावर मनात उमटलेले विचार तसेच आहेत. आज हा अभंग अधिक जवळचा वाटतो. जॉर्ज कार्व्हर अगदी यांची जीवनगाथा बाजूला ठेवून स्वतःच्या जीवनात जेव्हा हा अभंग पडताळून पाहते तेव्हा देखिल हाच विचार प्रवाहित होतो...की किरण असती बाहू माझे,  काहीही ना व्यर्थ जात.. Waste is only Tragedy आयुष्यातील काही मोलाची वर्षे फुकट गेली का? असा मनात प्रश्न उभा राहत असताना सदगुरुकडून उत्तर मिळते...खात्री मिळते...किरण असती बाहू माझे  काहीही ना व्यर्थ जात "जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यू लागो सार्थकी" ही प्रार्थना आद्यपिपादादांनी शिकविली. पण हा जन्म आणि हा मृत्यू केवळ एकाच वेळेचा आहे का?  माझा रोजचा होणारा जन्म आणि माझा रोजचा होणारा मृत्यू देखील सार्थकी लागला पाहीजे. माझ्या आयुष्यात येणारे विविध मृत्यू जसे किर्ती-अपकिर्तीचा मृत्यू, कर्तुत्वाचा मृत्यू, अपेक्षा-आशा-निराशा मृत्यू, अशा कोणत्याही प्रकारचे मृत्यू आणि त्या अनुषंगाने होणारे नविन जन्म हे देखिल सार्थ...

मृत्युच्या कविता -१ - मरण आलं होतं....

इमेज
कामासाठी वणवण फिरत होते हातात होते वजन पण पोटात नाही कण खिशात होता दाम पण संपत नव्हते काम कसबस काम संपवून अखेर जेवायला गेले भुकेचे वादळ केवळ वासानेच शमले पक्वान्नाने भरलेले समोर ताट शेवटी पिण्यासाठी थंडगार ताक घेणार पहिला घास तोच…… समोर रस्त्यावर लक्ष गेले कुणातरी कोवळया पोराला लोकांनी होते बेदम मारले हातातला घास तसाच राहिला होटल मालकाला जाब विचारला………  भुकेचे वादळ शमावयाला म्हणे, पोराने केली होती चोरी फुकट मार बसला अन् नाही मिळाली भाकरी चार दिवस अन्न न मिळालेला पोरगा स्व:तासाठी नाही तर  आईसाठी जगत होता चोरी करुनी का होइना पण आईसाठी सोसत होता……….  लागलीच ते पक्वान्न पॅक करुन त्याला दिले देव दिसला त्याला माझ्यात चटकन माझे पाय धरले ओशाळून मी जरा चार पावले मागे गेले जड़ झाले अंतकरण अन्, त्या दिवशी नाही जेवले……… काय माहित त्यादिवशी मोठं असं काय घडलं होतं ज्यामुळे न शमनाऱ्या माझ्या भुकेला मरण आलं होतं भुकेला मरण आलं होतं - रेश्मा नारखेडे 

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग 4- शेवटचा)

इमेज
थांब! अजून शेवटचा भाग संपला नाहीए. आत्मबलवर चार लेख लिहतेय. कारण एका भागात मला लिहणे आणि तुम्ही ते वाचण शक्य होणार नाही. इतका वेळ कुणाला आहे. पण रिल्स आणि शॉर्टसच्या जमान्यात वाचन हरवून बसलो आहोत. त्यामुळे आपले विचार प्रोसेस होत नाहीत. मला तरी असाच अनुभव आला त्यामुळे एका बाजूला लिखाण सुरु केले. असो, तर आता भरकटत जाण्यापेक्षा स्वतःलाच थांब! म्हणते. कारण आत्मबलमधील एक नाटक होत थांब!  विनोदाच्या अंगाने जाणारे हे नाटक हल्क फ़ुल्क असल तरिही समाजातील एका मोठ्या समस्येवर प्रकाश टाकणारे आहे. ती म्हणजे इजी मनी,  फास्ट मनीचा विळखा.  बापूंनी वारंवार सांगूनही ह्या विळख्यात बरेच जण अडकतात. तस होऊ नये म्हणून आईने हा मुद्दा इतका सुंदररित्या मांडला की तो या नाटकाच्या माध्यमाने पुरेपुर पोहोचला.  या नाटकातील जे मुख्य पात्र आहे. तिने फक्त संवाद आणि अभिनयातून विनोद नाही केला. तर तिचे संपूर्ण हावभाव, हातवारे अगदी सगळ्याचा उचित वापर करुन विनोद निर्माण होत होता. विनोदी शैलीतील नाटक करणे जास्त कठीण असते. कारण टायमिंगला पंच हवा तसा पडला नाही तर त्यात मजा येत नाही. पण फार उत्तम केले आहे. त्याल...

आमचा बापू लय भारी...आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी (भाग ३)

इमेज
काय योगायोग आहे बघा. उद्या शिवजयंती आणि आज मला आत्मबलमधील "हिरा" या इंग्रजी नाटकाबद्दल लिहण्यास मिळतय. अहाहा! नयनरम्य !! दुसरा शब्दच नाही माझ्याकडे.  इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है ! यावर नृत्य सुरू झाले आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे आगमन झाले. काय ते आगमन..!!! अंगावर काटाच आला. महाराजांचे आगमन झाले आणि आवाक होऊन आदराने प्रत्येक जण उभा राहीला. काय तो आब... काय तो रुबाब.. ज्या स्त्रीने ही महाराजांची भूमिका वठवली होती तिचे भूमिकेशी एकरूप होणे...समरस होणे इतक जबरदस्त होते की क्षणभर ही अस वाटले नाही, की ही भूमिका कुणी करीत आहे. हा धक्का इथवरच थांबत नाही.  पुढे अजून बरच काही आहे.  त्यातील प्रमुख बाब म्हणजे हे संपूर्ण नाटक इंग्रजीत आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक नाटक, चित्रपट आली असावीत. पण इंग्रजीतून एखादे नाटक असणे त्यात इंग्रजीतून महाराज आजच्या पिढीपर्यंत पोहोचणे हे विलक्षण आहे. इंग्रजीतून जरी हे नाटक असल तरी इतक सफाईदारपणे केले होते की त्यातील प्रत्येक भाव हा प्रत्येकाकडे पोहचत होता. It was purely love language. A mother's lo...

आमचा बापू लय भारी... आत्मबल २०२५ ची कथाच न्यारी..(भाग २)

इमेज
एका पावरपॅक स्वागतगीतानंतर वेळ होती ती नाटकाची.   एक नाटक बसवायचे म्हणजे काय खायच काम आहे का? त्याची तयारी एका छोट्याश्या संकल्पनेपासून होते आणि ती संकल्पना विस्तारत जात जात तिच्यात अनेक गोष्टी ऍड होत होत एक नाटक तयार होते. पुढे त्यात कास्टींग आणि कलाकारांकडून त्यात जीव ओतला जातो आणि त्यात अखंड तालीमी करत करत पुढे प्रयोग होतो.  हे सार एखाद्या प्रोफेशनल नटासाठी देखील सोप्प ठरत नाही. त्याच्याही कलेचा कस लागतो. इथे तर साध्या गृहीणी, नोकरदार, कॉलेजला जाणार्‍या स्त्रिया व मुली आहेत. सर्वच्या सर्व मुली. त्यांच्यामधून एखाद कॅरेक्टर बाहेर काढायचे तेही अगदी एक दोन महिन्यात हे अशक्य आहे. कुणाला यावर विश्वास बसणार नाही. पण "तू आणि मी मिळुन शक्य नाही, अस या जगात काहीच नाही" हे बापूंचे ब्रीद वाक्य मनात उतरवून नंदाई या तिच्या बाळांकडून सराव करुन घेते. त्यासाठी तिची मेहनत, तासन तास उभ राहण. होणार्‍या चुका अचूक हेरण. अगदी लास्ट मोमेंटला देखील एखादा बदल करण... हे सारं सगळ अनुभवायला मिळत.   पण हे सारं कशासाठी? तर इम्पॅक्ट. जी गोष्ट सांगून कळत नाही किंवा अनेकदा डोळे उघडत नाही ती ...