लघुरूप
जस जस सुरसा बदनु बढावा । तासु दून कपि रूप देखावा । सत जोजन तेहि आनन कीन्हा अति लघु रूप पवनसुत लिन्हा ।।११।। सुंदरकांडमधील ही ओवी आपल्याला हनुमंताचे लघुरूप दाखवते आणि खूप मोठी शिकवण देते. ती काय तर… सुरसेसारखे मोठे संकट समोर असताना किंवा चॅलेंज समोर असताना फार मोठ्या युक्तीने हनुमंत लघुरूप धारण करतात आणि समोरील संकट व चॅलेंज पूर्ण करतात. ह्या एका कृतीने हनुमान बाप्पा आपल्याला लघुरूप घेण्यास शिकवितात, तेही कधी तर संकट काळामध्ये…. साधी गोष्ट असते, महिनाअखेरीस जेव्हा तंगी असते तेव्हा आपोआप खर्च कमी होतात, काटकसर होते आणि पुढचा पगार येईपर्यंत तग धरला जातो. भारताचे माननीय पंतप्रधानांनी नुकत्याच केलेल्या घोषणा आणि दिलेला काटकसरीचा सल्ला मला असाच लघुरूप घेण्याकडे इशारा करत आहे असे वाटते. युद्ध अटळ आहे आणि भयावह आहे. आपण थेट प्रत्यक्ष युद्धात नसलो तरी त्याची झळ पोहोचणारच. पण तरीही ती कमीत कमी पोहोचावी यासाठी प्रयत्नशील असणे फार गरजेचे आहे आणि यासाठी नागरिकांनी आधीपासून स्वतःवर बंधने घालणे, अर्थात लघुरूप धारण करणे आवश्यक आहे. मोदीजींनी मांडलेला मुद्दा हा आयात, परकीय चलनाचा साठा, रुपयाची घ...