किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...

Updated - १३ मे २०१३ साली "कमळ पाहिले मी राया" हा अभंग ऐकला. तेव्हा जे मनात उमटल ते पुढील लेखात आहे. आज तब्बल १२ वर्षांनी देखील हा अभंग आणि त्या अभंगावर मनात उमटलेले विचार तसेच आहेत. आज हा अभंग अधिक जवळचा वाटतो. जॉर्ज कार्व्हर अगदी यांची जीवनगाथा बाजूला ठेवून स्वतःच्या जीवनात जेव्हा हा अभंग पडताळून पाहते तेव्हा देखिल हाच विचार प्रवाहित होतो...की किरण असती बाहू माझे, काहीही ना व्यर्थ जात.. Waste is only Tragedy आयुष्यातील काही मोलाची वर्षे फुकट गेली का? असा मनात प्रश्न उभा राहत असताना सदगुरुकडून उत्तर मिळते...खात्री मिळते...किरण असती बाहू माझे काहीही ना व्यर्थ जात "जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यू लागो सार्थकी" ही प्रार्थना आद्यपिपादादांनी शिकविली. पण हा जन्म आणि हा मृत्यू केवळ एकाच वेळेचा आहे का? माझा रोजचा होणारा जन्म आणि माझा रोजचा होणारा मृत्यू देखील सार्थकी लागला पाहीजे. माझ्या आयुष्यात येणारे विविध मृत्यू जसे किर्ती-अपकिर्तीचा मृत्यू, कर्तुत्वाचा मृत्यू, अपेक्षा-आशा-निराशा मृत्यू, अशा कोणत्याही प्रकारचे मृत्यू आणि त्या अनुषंगाने होणारे नविन जन्म हे देखिल सार्थ...