पोस्ट्स

जून १९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

​रोनाल्डो, पोर्तुगाल आणि टीमवर्कचा खरा धडा

मी काही फुटबॉल लवर नाही पण मला मेस्सी आणि रोनाल्डो दोघांचेही गेम आवडतात. त्यातील सगळं समजत असंही नाही. मुलांमुळे थोडफार समजते.  पोर्तुगाल आणि काँगोचा सामना पाहिला. त्यावरील अनेक व्हिडिओ आणि विविध मतप्रवाहही वाचले. त्या सगळ्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. अतिशय महान आणि जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या रोनाल्डोसारख्या खेळाडूला त्याच्याच संघाने काही प्रमाणात एकटे पाडल्याचे चित्र अनेकांना दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे करूनही संघाने काही विशेष यश मिळवले नाही; सामना अखेरीस बरोबरीत सुटला. पण सामन्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती पोर्तुगाल संघाच्या खेळातील समन्वय आणि वर्तनाची. या विषयावर दोन्ही बाजूंची मते आहेत. काही जण म्हणतात की संघ कोणत्याही एका खेळाडूपेक्षा मोठा असतो, तर काहींना वाटते की रोनाल्डोसारख्या अनुभवी आणि निर्णायक खेळाडूला दुर्लक्षित करणे ही मोठी चूक ठरली. सत्य कदाचित या दोन्ही मतांच्यामध्ये कुठेतरी असेल. पण या प्रसंगातून एक महत्त्वाचा धडा नक्की मिळतो. प्रत्येक खेळाडू स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या संघासाठी आणि देशासाठी खेळत असतो. रोनाल्डो हा महान खेळाडू आहे. ...