आधी ते सावधपण - मला समजलेली गोजीबाई भाग २

खर तर गोजिबाईवर लिहू तितके कमी आहे. कथामंजीरी १-६ मध्ये काशिनाथ म्हणतात, "माझी गोजी माणसांना नीट ओळखणारी आहे." अग्रलेखांमध्ये हे वाक्य चटकन येऊन जात. पण तीची ही क्वालिटी अतीशय सुपर आहे. आजच्या कलियुगात ही कला म्हणजेच माणस ओळखण्याची कला नीट अवगत असणे अत्यंत आवश्यक आहे. गोजीकडे असलेले हे नैपुण्य तीला त्या वस्तीबद्दल खरी माहिती करुन देत. नेहमी आपण ऐकतो समोरुन गोड बोलणारी माणस कधी पाठीत सुरा खुपसतील याचा काही नेम नाही. नेहमी वडीलधारी माणस सल्ला देतात की माणस ओळखायला शिका आणि ९९ टक्के आपण इथेच फसतो. अभिनय कौशल्य सिद्ध होण्यासाठी प्रत्येक माणसाने स्टेजवरच काम केले पाहिजे अस काही नाही. खर्या आयुष्यात ही अगदी प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिका वठवत असतो, विविध रुपे घेत असतो. स्वतःच्या स्वार्थ सिद्धिसाठी नाना बनाव रचित असतो. या अश्या सगळ्या माणसांना आपल्याला ओळखता आले पाहिजे. तसेच चांगल्या, शुद्ध मनाच्या माणसांना ओळखता येणे देखिल फार गरजेचे आहे. एकंदरीतच संपुर्ण कथामंजिरीमध्ये गोजीबाईची ही क्षमता आपल्याला वेळोवेळी पाहण्य़ास मिळते. सुरुवातीला...