मला समजलेली ’गोजीबाई’ - कथामंजीरी ४ मधील मुख्य पात्र
कथामंजिरी ४ मधील गोजीबाई हे कॅरेक्टर माझ्या मनात घर करुन गेले. या गोजीबाईबद्दल काही मुद्दे
ही गोजिरी, गोजीरवाणि सुंदर आहे. जिच बालपण सातार्यात गेले आहे. सख्खी ८ भावंडे आहेत. ७ वी पर्यंत शिकलेली आहे. इंग्रजीची आवड असणारी आहे. अभ्यासाची आवड असणारी आहे. जीचे वडील वारकरी आहेत. तीला भजनाची सवय आहे. हार्मोनियम वाजविता येतो. अभंग १००च्यावर पाठ आहेत. काशीनाथ पाटलाबरोबर विवाह झालेला आहे आणि तिला दोन मुली व एक मुलगा आहे.
जिची हरिहरावर नितांत श्रद्धा आहे. जिचे आजूबाजूचे निरिक्षण करण्य़ाची क्षमता उत्तम आहे. जी सावध आहे. जिच्या निती अनितीच्या संकल्पना, पातिव्रत्याच्या संकल्पना स्पष्ट आहेत. ती अत्यंत प्रॅगमॅटीक आहे. तिच्यात एका पुरुषाला समर्थपणे दोन लगावून देण्याची शारिरीक आणि बौद्धीक क्षमता आहे. तसेच ती एक उत्तम अभिनय करु शकते. एखादी कला, गोष्ट आत्मसात करण्य़ाची तीची क्षमता अफाट आहे आणि आत्तापर्यंतच्या कोणत्याही भागात ती स्वतः न्यूनगंडात असल्याचे जाणवले नाही.
हा भगवान त्रिविक्रम माझ्याकडून सर्व काही करुन घेईल. हा तिचा विश्वास मात्र दिसून येतो. त्यामुळे अवघडातील अवघड कार्य तीला शक्य झाले आहे. स्वसंरक्षण कसे करावे याबाबत ती पूरेपूर जाणते. प्रसंगावधान तर आहेच पण थोड्याच काळात पटकन निर्णय कसा घ्यायचा हे तिला सहज जमते.
असे अनेक गुण गोजीबाईचे कथामंजिरीत दिसून येतात. एका गावाकडच्या साध्या बाईचे हे कॅरेक्टर बापूंनी आपल्या समोर उभे करुन, आपल्यालाएक खुप मोठा आधार आणि बळ आहे अस मला वाटते. त्यात पहिला गुण म्हणजे तर्क कुतर्क मनात न आणता हरिहरावर अचाट श्रद्धा आणि त्याच्याशी सतत संवाद करत राहणे. आपण या देवाची लेकरे आहोत म्हणुन स्वतःच्या क्षमतेवर कधी अविश्वास दाखवयचा नाही कारण हा त्रिविक्रम आपल्याकडून काहीही करुन घेऊ शकतो हे तिला ठाऊक आहे.
या कथामंजिरीत एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती म्हणजे गोजीबाईने घेतलेला प्रत्येक निर्णय हा तिच्या भगवंताला साक्षी मानून घेतलेला आहे. यासाठी तिने आजूबाजूच्या परिस्थीतीचा अभ्यास केलेला आहे. काही घटनांमध्ये गोजीबाईने कल्पनाशक्ती, निरीक्षणशक्ती आणि निर्णयशक्तीचा केलेला पूरेपूर वापर दिसून येतो.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा हरि येईल आणि सर्व करेल अश्या भ्रमात ती कुठेही ती नाही दिसली. हरी माझ्यासोबत आहेच ह्या विश्वासाने तीने प्रत्येक पाऊल उचलेले दिसत आहे.
श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज सत्यप्रवेशामध्ये बापू म्हणतात,
आपल्या जीवनाला भयमुक्त करण्यासाठी आवश्यकता असते, ती विवेकबुद्धीचा वापर करुन योग्य निरिक्षणाद्वारे उचित निर्णय करण्याच्या अभ्यासाची. ही गोष्ट सरावानेच प्राप्त होते. परंतु त्यासाठी लागणारे बळ मात्र श्रद्धेपोटीच जन्म घेते. पवित्र तत्वांवर असणारी श्रद्धा.
कथामंजिरीमध्ये ही गोष्ट अधोरेखित होते आणि नेमक हेच गोजीबाई करताना दिसते. गोजीबाईबरोबर राहून तीच्या मुली व मुलगा तेही तल्लख होताना दिसतात. काशीनाथरावांचे पण असच आहे. हे कुटुंब त्यांच्या जीवनात ठाई ठाई श्रीमद्पुरुषार्थ अवलंबिताना दिसतात.
श्रीमद्पुरुषार्थ ग्रंथराज सत्यप्रवेशामध्ये चरण ४१ आपल्याला सावधपणा संगते.
प्रपंच असो की वैराग्य, भक्त असो की अभक्त, ह्या मानवी जीवनात दर क्षणाला सर्वात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे ’सावधपणा’
हा सावधपणा मला गोजीबाईमध्ये ठाई ठाई दिसतो.
आणि पुढे चरण ४१ मध्ये म्हटले आहे की,
मी सावध असेन तरच मी घडणार्या घटनांचा अर्थ नीट समजून घेऊ शकतो व माझ्याशी संबंधीत गोष्टींचा नीट अर्थ कळला तरच मी सावधपणे पुढील हालचाल करु शकतो.
गोजीबाई सावध असल्याने तीला उचित तो मार्ग सापडत राहतो.
असे काही मुद्दे मला सुचत होते गोजीबाई अभ्यासताना म्हणून ते एकत्रित करण्याचा प्रयास केला.
पिपा म्हणे सोडा घाई,
शिक्षण अनिरुद्धाच्या पायी
एका स्त्रीने समाजत कसे असावे, कोणत्या माईंडसेटने वावरावे, कोणते गुण अंगीकारावे, हे सर्व काही गोजीबाईच्या कथेतून बापू स्पष्टपणे मांडत आहेत. तसे व्यक्तीमत्व स्वतःचे घडवू शकलो तर या कलियुगात प्रत्येक स्त्री समर्थ होऊ सकते आणि तिच्या पाठीशी तिचा हरिहर नक्की उभा असेल. कारण या कलियुगात आपले युद्ध आपल्यालाच लढायचे आहे. असे मला वाटते.
- रेश्मावीरा नारखेडे
ThinkBigReshma
टिप्पण्या
श्रीराम अंबज्ञ नाथसंविध विरा
अंबज्ञ, नाथसंविन
अंबज्ञ