पोस्ट्स

तशी उलघडली मला आज आई - गद्य कविता. Marathi Poem - ThinkBigReshma

इमेज
सुगंध पसरवित जशी उमलली जाई  अशी उलघडली मला आज आई 'आ' म्हणुनी आत्मा जागविला  'ई' म्हणुनी ईश्वर भेटविला  आत्मा जागवणारि ईश्वरी दाती ती होई  अशी उलघडली मला आज आई सहन करी ती भार कुकर्माचा  अत्याचार सोसे पोटच्या बालकांचा  तरी न कोपे ती वसुंधरा माई  अशी उलघडली मला आज आई असंख्य पापांनी माखलेले आयुष्य आमचे  पावन करुनी ती, अविरत धुवत असे  स्वतः मलिन होउनी, पुण्यदाती गंगा ती होई  अशी उलघडली मला आज आई कोटी देव सामावुनी पोटी सात्विकतेचे दान घालिते ती ओटी  झरा वात्सल्याचा सदा पाझरता ठेवती ह्या गाई  अशी उलघडली मला आज आई यवन अत्याचाराचा झाला कहर लोपले निति-धर्म-सत्व, अंधाराचा प्रहर घडवुनी शिवराय, जिजाऊ तप्त तेजसूर्य देई  अशी उलघडली मला आज आई अवघड जी वाट रांगड्या मर्दांना  सहज उतरुनी ती जाई, कापुनी कड्यांना ममतेचा पराक्रम हिरकणी गाजवुनी राही  अशी उलघडली मला आज आई पारतंत्र्याच्या बेडीत स्वतः अडकुनी  जागविला पुरुषार्थ लेकरांच्या मनी  आज ती स्वतंत्रदेवता, पण सहन केले किती आम्हा पाई  अशी उलघडली मला आज आई आ...

नाही कळले कधी....जीव वेडावला.....Short Love Story (Fictional)

इमेज
ती तिथे कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली होती. ऍडमिशनसाठी सगळे ओरिजनल डॉक्युमेंटस झेरॉक्स यांच्या विळख्यात कशी बशी पिवळ्या ड्रेसची पिवळी ओढणी सांभाळत जगावेगळी कसरत करत होती. मऊ रेशमी बेभान झालेले केस सावरण्यासाठी जरा वैतागूनच मान वर केली आणि तिथेच घात झाला..... पल्सरवरुन रुबाबात येणार्‍या एका झंजावाताकडे तिची नजर खिळली आणि सगळी कागदपत्रे इतस्त पसरली... तिला काहीच कळल नाही.... तो झंझावात क्षणार्धात तिच्या जवळ येऊन स्थिरावला... बाईकवरुन उतरुन तिची कागदपत्र गोळा करुन तिच्या हातात दिली...आणि निघून गेला... तिल काहीच कळल नाही.... ती उभी होती स्तब्ध.... इतक्या वर्षात प्रथमच तिचा काळजाचा ठोका चुकला होता... पण कुणासाठी...कोण तो...काय त्याच नाव आणि हाच का तो.. अशा अनेक प्रश्नांनी ती गोंधळून गेली.  पण उत्तर कधीच मिळाली नाही. तीने बी कॉम फस्ट इयरला ऍडमिशन घेतले होते... तो.....माहित नाही... तेव्हा दिसला तो एकदा आणि शेवटचाही.... त्यानंतर मात्र तिचा काळजाचा ठोका कुणी चुकवू शकले नाही... तीन वर्ष सतत अभ्यास...घर...आणि हृदयातील तो...इतकच तिच विश्व होत... एका न...

एक एक पाकळी प्रेमाची

इमेज
वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी. यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे. हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते.  आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प...